Shirdi Bus Accident News: साखर झोपेतच दहा भाविक ठार; मुख्यमंत्र्यांकडून साह्य!

भाविकांच्या बसला शिर्डी महामार्गावर अपघातात 10 भाविक ठार
Bus Accident on Sinner-Shirdi Highway
Bus Accident on Sinner-Shirdi HighwaySarkarnama

नाशिक : (Nashik) आज पहाटे शिन्नर-शिर्डी (Sinner) महामार्गावर पाथरे येथे शिर्डीला (Shirdi) जाणाऱ्या भाविकांची बस आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात मुंबईतील (Mumbai) दहा भाविक ठार झाले. या अपघाताबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दुःख व्यक्त केले. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली. (Accident to saibaba divotee`s Bus On Sinner-Shirdi highway)

Bus Accident on Sinner-Shirdi Highway
Congress news; डॉ. सुधीर तांबे यांनी तीन महिने काय केले?

आज पहाटे मुंबईहून शिर्डीला जाणारी खाजगी बस (एम. एच. 04 एस. के. 2715) आणि शिर्डीकडून सिन्नरकडे निघालेल्या ट्रकचा (एम. एच. 48 टी 1292) पाथरे (सिन्नर) जवळ अपघात झाला. या अपघातग्रस्त बसमध्ये पन्नास प्रवासी होते. यातील बहुतांशी प्रवाशी अंबरनाथ येथील होते. यातील दहा प्रवाशी ठार झाले तर सतरा प्रवाशी गंभीर जखमी झाले.

Bus Accident on Sinner-Shirdi Highway
China News : चीनमधील भारतीय विद्यार्थी,नोकरदार असुरक्षित; 'ही' धक्कादायक माहिती समोर

नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com