मुख्यमंत्र्यांनी थोड ठाण्याच्या पुढेही यावं, खड्डे पहावे!

छगन भुजबळ म्हणाले, काय पाउस, काय पूर, काय खड्डे, सगळेच ओके.
CM Eknath Shinde News, Chhagan Bhujbal News, Maharashtra Political News, Rajkiya Batmya, Political News,
CM Eknath Shinde News, Chhagan Bhujbal News, Maharashtra Political News, Rajkiya Batmya, Political News, Sarkarnama

नाशिक : काय पाउस.. काय पूर.. काय खड्डे सगळेच ओक्के हाय... अशी सुरुवात करीत माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मुंबई महामार्गावर भिंवडीपासून नाशिकपर्यत खड्यांचे साम्राज्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे ठाण्याचे आहेत. राज्यातील जवळपास सगळेच विभागाचे मंत्री तेच आहे. त्यामुळे त्यांनी ठाण्याच्या जरा पुढे येऊन रस्त्यांची अवस्था पहावी, असा टोमणा मारला. (CM Eknath Shinde shall come forward of Thane & See pits on Road)

CM Eknath Shinde News, Chhagan Bhujbal News, Maharashtra Political News, Rajkiya Batmya, Political News,
जुन्या योजनांचे पुनरूज्जीवन; मुख्यमंत्री आरोग्य सहायता योजना नव्याने सुरू होणार का ?

शहरातील पूरस्‍थितीची पाहणी आज त्यांनी केली. यानंतर पूरग्रस्तांच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सुरुवातीलाच `काय पाउस... काय पूर... काय खड्डे.. सगळेच ओके` अशी मिश्किल टिप्पणी करीत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना महामार्गावरील खड्यांची पाहणी करण्याचे आवाहन केले.(Maharashtra Political News in Marathi)

CM Eknath Shinde News, Chhagan Bhujbal News, Maharashtra Political News, Rajkiya Batmya, Political News,
मोदींच्या 'ड्रिम प्रोजेक्ट' ला शिंदे सरकारकडून हिरवा कंदील ; बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा

श्री भुजबळ म्हणाले की, शहरात आणि महामार्गावर प्रचंड खड्डे झाले आहे. पावसाचे प्रमाण मोठे आहे. जे रस्ते कधी गावाचे मार्ग होते त्या रस्त्यांचे राज्य मार्ग आणि त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग झाले आहे. जुन्या रस्त्यांवर थर टाकून रस्ते झाले खरे पण जुने स्ट्रक्चर मात्र तेच आहे. त्यामुळे पाउस झाला म्हणजे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. नागरिकांना प्रचंड त्रास होतो. मनस्ताप सहन करावा लागतो. हा सार्वत्रिक प्रश्न आहे. मुंबई- नाशिक महामार्गाची अवस्था खूपच वाईट आहे.

मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत. बांधकाम खाते, एमएमआरडीए, राज्य रस्ते विकास महामंडळ सध्या सगळ्या विभागाचे आधिकार मुख्यमंत्र्यांकडेच आहेत. तेच सगळ्या विभागाचे मंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी थोड ठाण्याच्या पुढे येऊन रस्त्यांची दुरावस्था पाहावी, असे आवाहन केले. (Chhagan Bhujbal News)

रस्त्यावर पावसाने पडलेले खड्डे कोल्डमिक्सने भरावे लागणार आहे. काही रस्ते लगेच पावसाळ्यात दुरुस्त करता येणार नाही. पावसाळा थांबेपर्यत वाट पहावी लागणार आहे. अशा ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावर पोलिसांची कुमक वाढविली पाहिजे. रस्त्यावर खड्यामुळे ट्रॅफीक जॅमचे विषय वाढले आहेत. वाहातूकीच्या रांगा लागतात. अपघात वाढत असतांना रस्त्यावर पोलिस वाढवावेत.असेही त्यांनी सांगितले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in