Shivsena: मुख्यमंत्री शिंदे गटाचा भाजपला ‘दे धक्का’

नाशिकचे पालकमंत्रिपद स्वतःकडे ठेवत मुख्यमंत्री शिंदे गटाने केली आगामी राजकारणाची पेरणी
Dada Bhuse and Girish Mahajan
Dada Bhuse and Girish MahajanSarkarnama

नाशिक : राज्यात (Maharashtra) स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने तीन महिन्यांनी का होईना जिल्ह्याच्या पालकमंत्री पदांची नावे निश्चित केली आहेत. सत्ता स्थापनेचे ‘घोडं गंगेत न्हालं’, असं म्हटलं जात असलं तरी प्रत्यक्षात पालकमंत्रिपदाच्या वाटपातून या सरकारमध्ये (Shinde Government) आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिकच्या (Nashik) पालकमंत्रिपदी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे नाव अखेरपर्यंत निश्चित असताना जाहीर करण्यात आलेल्या यादीतून ते वगळण्यात आल्याने यावरून ही बाब स्पष्ट झाली आहे. दुसरीकडे महाजन यांना देण्यात आलेले जिल्हे पाहता त्यांना डावलण्याचा हा प्रयत्न आहे, असेही बोलले जात आहे. (Girish Mahajan followers and BJP office bearers unhappy with new Guardian minister`s appointments)

Dada Bhuse and Girish Mahajan
यशोमती ठाकूर म्हणाल्या, काँग्रेस संपली नाही, संपणारही नाही...

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व नेते राज्यातील नवे सरकार आल्यावर प्रशासनावर धाक निर्माण करीत आता पालकमंत्री आमचाच अशा थाटात वावरत होते. यासंदर्भात गिरीष महाजन यांनी केलेल्या दौऱ्यांतून देखील अधिकाऱ्यांना अशा प्रकारचे संकेत दिले जात होते. त्यामुळे महाजन यांची संधी गेल्याने त्यांचे समर्थक नाराज होणार हे स्पष्टच आहे.

Dada Bhuse and Girish Mahajan
Ajit Pawar : एकमेकाला इतक्या खालच्या पातळीला जाऊन हिणवण्याचं काम करू नका रे बाबा !

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे तब्बल ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फुटले. त्यानंतर राज्यात भाजपच्या मदतीने शिंदे मुख्यमंत्री झाले, तर भाजपचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतरही महिन्याने मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरदेखील जिल्ह्यांना पालकमंत्र्यांची प्रतीक्षा होती. सरकारकडून याबाबतचे स्पष्टीकरण दिले जात नसले तरी न्यायालयाचा निकाल विरोधात लागल्यास शिंदे सरकारची नाचक्की होईल, या भीतीने पालकमंत्रिपदे जाहीर केली जात नव्हती, असा कयास लावला जात होता.

स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्याची परंपरा आहे, त्याला अनुसरून घाईघाईने तात्पुरत्या स्वरूपात ध्वजवंदनासाठी मंत्र्यांची घोषणा करण्यात आली. त्यात नाशिकच्या ध्वजवंदनाचा मान माजी पालकमंत्री व विद्यमान ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना मिळाला. त्यामुळे नाशिकचे पालकत्वही त्यांनाच मिळणार, असे बोलले जात होते व त्यात तथ्यदेखील होते. पालकमंत्री जाहीर झाले नसले तरी महाजन यांच्याकडून नाशिक संदर्भातील प्रश्न शासनदरबारी मांडले जात आहेत.

त्याशिवाय अधिकाऱ्यांशी संवाद साधणे, पक्षाच्या सर्व जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबईत ठाण मांडून बसणे यामुळे नाशिकचे पालकमंत्री घोषित नसले, तरी गिरीश महाजन हेच असतील, असे बोलले जात होते. तीन महिन्यांनंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यात नाशिकमधून महाजन यांचा पत्ता कट करून बंदरे व खनिजमंत्री दादा भुसे यांच्याकडे पालकमंत्रिपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत.

पालकमंत्रिपदाची अंतिम यादी घोषित होण्यापूर्वी आणखी एक यादी सोशल मीडियावरून व्हायरल होत होती. त्यात नाशिकचे पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्या नावासमोर दिसत होते. असे असताना सचिवालयातून जाहीर झालेल्या यादीत दादा भुसे यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्रिपद दर्शविण्यात आले. जवळपास गिरीश महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असताना शिंदे गटातील दादा भुसे यांचे नाव पालकमंत्रिपदी आल्याने श्री. महाजन यांना डावलत शिंदे गटाने भाजपवर मात केली आहे. दुसरीकडे भाजपमधूनही संकटमोचक महाजनांवरच संकट कोसळल्याची भावना व्यक्त होत आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in