नाशिकच्या बंडखोरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बळ देणार

मुख्यमंत्र्यांच्या नियोजन आढावा बैठकीचे नाशिक ऐवजी मालेगावला नियोजन सुरु आहे.
Eknath Shinde, Chief Minister
Eknath Shinde, Chief MinisterSarkarnama

नाशिक : माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thakrey) यांच्या शिव संवाद मेळाव्यानंतर आता बंडखोरांचा (Rebel Group) गटही नाशिकमध्ये (Nashik) सक्रिय होणार आहे. बंडखोरांना बळ देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शनिवारी नाशिक दौऱ्यावर येणार आहे. मुख्यमंत्र्याच्या दौरा नाशिकला होणार असला तरी, त्याचे केंद्रबिंदू मात्र नाशिकच नव्हे तर मालेगाव राहणार आहे. (CM Shinde will visit Malegaon to give moral support to Rebels)

Eknath Shinde, Chief Minister
`साहेब, आम्ही गद्दार नाही ,तुम्हाला सोडून जाणार नाही`

पालकमंत्री नसलेल्या नाशिक जिल्ह्यात मालेगावला माजी मंत्री दादा भुसे यांच्या मतदार संघात उत्तर महाराष्ट्राची विभागीय आढावा बैठकीसह बंडखोरांना बळ देणार आहे. तसेच यानिमित्ताने प्रथमच मालेगावला उत्तर महाराष्‍ट्राची विभागीय बैठक होणार असल्याने पुढच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मालेगाव राहणार असल्याचे संकेत मानले जात आहेत.

Eknath Shinde, Chief Minister
चंद्रकांत रघुवंशी आमदारकीच्या लालसेने शिंदे गटात गेले!

सहाजिकच पालकमंत्री म्हणून दादा भुसे यांच्या नावाची या निमित्ताने चर्चा सुरु झाली आहे. शिवसेनेत बंडाळीनंतर खासदार हेमंत गोडसे यांच्यासह माजी मंत्री दादा भुसे आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या समर्थन दिले आहे. बंडाळीनंतर पक्षार्तगत डागडूजीसाठी संपर्क नेते खासदार संजय राऊत यांनी त्यापाठोपाठ माजी मंत्री तथा युवा नेते आदित्य ठाकरे यांनी नाशिकला मेळावे घेतले.

नाशिकच केंद्रस्थानी

खासदार राऊत यांनी मेळावा घेत शिवसेना जागेवरच असल्याचे जाहीर केल्यानंतर खासदार गोडसे यांनी बंडखोरीचा बिगूल फुंकला होता. याच दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर आमदार कांदे यांनी काय चुकले? म्हणत त्यांना निवेदन देण्याच्या नावाखाली वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला होता. या सगळ्या घटना घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांचा नाशिक दौरा होणार आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर शिवसेनेचे संपर्क नेते खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी नाशिकमध्ये सुरवात करीत मेळावे घेत शक्तीप्रदर्शन केले. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री शिंदे हे सुद्धा बंडखोरांना एकत्रित करीत त्यांच्या शक्तीप्रदर्शनाची सुरवात नाशिकमधूनच करणार आहेत. त्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील विभागीय आढावा बैठकीचे निमित्त असणार आहे.

मालेगावला बैठक

वरिष्ठ मंत्री दादा भुसे यांनीही बंडखोरी केली आहे. तसेच नाशिकला पालकमंत्री नसल्याने हा मेळावा मालेगाव येथे होणार अशी चर्चा आहे. विभागीय महसूल आढावा बैठक नाशिक ऐवजी मालेगावला झाल्यास, तेही लक्षवेधी ठरणार आहे. आत्तापर्यंत विविध मुख्यमंत्र्याच्या काळात नाशिक रोडला विभागीय आढावा बैठका झाल्या. श्री. शिंदे यांच्या दौऱ्यानिमित्ताने दरवेळी नाशिकला होणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तालुका क्रिडा संकुलात ही आढावा बैठक होऊ शकते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in