Eknath Shinde; आदित्य ठाकरेंचे अनुकरण? अयोध्या दौऱ्याची होतेय तयारी

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याचे एकनाथ शिंदे समर्थकांसह अयोध्येला जाण्याच्या तयारीत
CM Eknath Shinde with Ayodhya saints
CM Eknath Shinde with Ayodhya saintsSarkarnama

नाशिक : शिवसेना (Shivsena) एकसंध असताना भाजपच्या (BJP) हिंदुत्वाला जशास तसे उत्तर देण्यासाठी अयोध्या (Ayodhya) येथील शरयू नदीच्या आरती केली जात होती. त्याचे नियोजन विशेष करून नाशिकच्या (Nashik) पदाधिकाऱ्यांकडे होते. शिंदे गट स्थापन झाल्यानंतरदेखील आता नाशिकच्या नेत्यांनी अयोध्या दौऱ्यासाठी पुढाकार घेतला आहे. यानिमित्ताने शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackrey) दौऱ्याचे अनुकरण होत असल्याची चर्चा आहे. (Shivsena rebel Shinde group will visits Ayodhya visit in February)

CM Eknath Shinde with Ayodhya saints
NMC News; पुलकुंडवारांची तंबी...हिशेब सादर करा अन्यथा कारवाई!

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची महाविकास आघाडी अस्तित्वात आली. या महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांनी आपले तत्त्व सांभाळून विकासाचा अजेंडा राबविला होता.

CM Eknath Shinde with Ayodhya saints
Chitra wagh news; तुमचे राजकारणातले रंग पाहून कीव येते!

याच दरम्यान भाजपने शिवसेनेला हिनावताना हिंदुत्व सोडल्याची टीका केली जात होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रामलल्ला दर्शन व अयोध्येतील शरयू नदीच्या आरतीचे नियोजन केले जाऊ लागले. अयोध्या दौऱ्याची जबाबदारी मुख्यत्वे नाशिकच्या पदाधिकाऱ्यांकडे राहिली. दोनदा अयोध्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले.

आरतीच्या नियोजित तारखांच्या आधी शिवसेनेचे शिष्टमंडळाकडून प्रवासासह अयोध्येतील इव्हेंटचे नियोजन करतात. शरयू नदीच्या आरतीचा कार्यक्रम दोनदा यशस्वी झाला. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिंदे गटाने शिवसेनेवरच दावा ठोकताना त्यांचीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. त्याअनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी शिंदे गटात समाविष्ट करून घेतले जात आहे. मागील महिन्यात नाशिकमध्ये १३ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांकडून अयोध्या दौऱ्याचे नियोजन केले जात आहे.

मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

शरयू नदीवरील महाआरतीचे प्रमुख महंत शाशिकांतदास महाराज, महंत छबिरामदास महाराज, महंत शत्रुघ्नदास महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांनी अयोध्येत येऊन रामलल्लाचे दर्शन घ्यावे व शरयू नदीची आरती करण्याचे निमंत्रण दिले. निमंत्रणाला मान देताना मुख्यमंत्र्यांनी लवकरच अयोध्येला येण्याचे आश्वासन दिले. या वेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, सचिव भाऊसाहेब चौधरी, खासदार राहुल शेवाळे, माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लवकरच अयोध्या दौरा होणार असून, त्याचे नियोजन नाशिकसह ठाणे येथील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी करणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दौऱ्याचे नियोजन आहे.

- भाऊसाहेब चौधरी, सचिव, बाळासाहेबांची शिवसेना.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com