Eknath Shinde : खान्देशना लोके पक्का दिलदार शेतस, मूठभर लेतस आणि तगारीभर देतस !

Eknath Shinde : ‘रामराम, कसा सेतस बठ्ठा, दिवाळी कशी गयी जोरमा..
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Eknath Shinde : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी पहिल्यांदाच नंदूरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी खान्देशातील जनतेची मन जिंकली. भाषणाला त्यांनी चक्क अहिराणी भाषेतून सुरवात केली अन् उपस्थितांनी एकच जल्लोष केला. (cm Eknath Shinde Nandurbar Visit news)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषणाची सुरुवातच अहिराणीतून केली. ‘रामराम, कसा सेतस बठ्ठा, दिवाळी कशी गयी जोरमा, खान्देशना लोके पक्का दिलदार शेतस, मूठभर लेतस आणि तगारीभर देतस,’ असे म्हणताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. मुख्यमंत्री आपल्या भाषेत बोलत असल्याचे अनेकांना नवल वाटलं. त्यांनी दिलखुलासपणे मुख्यमंत्र्यांच्या या भाषणाला दिलखुलासपणे प्रतिसाद दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "नवापूर औद्योगिक वसाहतीसाठी १३२ केव्ही वीज उपकेंद्रासाठी तत्काळ जागा उपलब्ध करून देण्यासोबतच आदिवासी समाजातील कुपोषणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील,"

Eknath Shinde
Eknath Shinde : माजी आमदारांनी विलासरावांचा किस्सा सांगितला अन् मुख्यमंत्र्यांनी फोन फिरवला..

नंदुरबार नगरपालिका इमारतीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आले होते. यावेळी त्यांच्यासोबत नंदूरबारचे पालकमंत्री विजयकुमार गावित, भाजप खासदार हिना गावित, खनिकर्म मंत्री दादा भुसे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते. शिंदे यांच्या हस्ते नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांना छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरातील कार्यक्रमात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एक किस्सा सांगितला. "दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख एकदा नंदूरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी तीन दिवसांत एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता," असे रघुवंशी यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले. नंदुरबार जिल्ह्यासाठी निधी रखडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या विधानानंतर लगेचच मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या खिशातील मोबाईल काढून मंत्रालयात अधिकाऱ्यांना कॉल केला आणि नंदूरबार शहराच्या विकासासाठी रखडलेल्या सात कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचे आदेश दिले.

"शेतकऱ्यांच्या नियमाने मदत जर केली असती तर 1500 कोटी रुपये लागले असते मात्र, आम्ही 6000 कोटी रुपये वाटलेत. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला.आता काही जण बांधावर जातायेत त्या सर्वांना मी कामाला लावले," अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे पिता-पुत्रांना टोला लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com