बंडखोर खोकेबाजांना ठोकेबाजीने उत्तर दिले जाईल!

मराठी माणुस आम्ही लाल किल्ल्याला नव्हे रायगडाला मुजरा करतो!
Sanjay Raut In Meeting
Sanjay Raut In MeetingSarkarnama

नाशिक : महाराष्ट्राचे (Maharashtra) तुकडे करण्याचे भाजपचे (BJP) मनसुबे आहेत. त्या दिल्लीश्र्वरांपुढे महाराष्ट्राचा नजराना घेऊन मुख्यमंत्री झुकले. मराठी माणसांचे हायकमांड दिल्लीत नव्हे मातोश्रीवर आहे. आम्ही दिल्लीपुढे झुकणारे नाही. आम्ही लाल किल्ल्यापुढे नव्हे तर रायगडाला मुजरा करतो, असे प्रतिपादन शिवसेना (Shivsena) नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. (Sanjay Raut criticise Cm Eknath Shinde for rebel)

Sanjay Raut In Meeting
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे शिवसेना आमदारांना नापसंत पडले?

यावेळी श्री. राऊत यांनी मुंबईत शिवसेना आहे तो पर्यत दिल्लीला महाराष्ट्रापासून कुणालाही तोडता येणार नाही. भाजपला महाराष्ट्रापासून मुंबई तोडायची आहे. मुंबई वाचविण्यासाठी महाराष्ट्राने १०५ हुतात्मे दिले पण महाराष्ट्र कधी दिल्लीपुढे झुकला नाही. हा इतिहास आहे. आता ज्यांनी शिवसेना तोडली. त्या दिल्लीश्वरांना मुजरा करण्यासाठी हे बंडखोर गेले. पण सगळ्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की, शिवसेना अंगार आहे, अंगार पेटत नाही. पण पेटलाच तर विझतही नाही. त्यामुळे शिवसेनेशी गद्दारी केलेल्यांच्या बुडाला आग लागल्याशिवाय रहाणार नाही. हा महाराष्ट्र केवळ आदेशाची वाट पहातो आहे. असा इशारा दिला.

Sanjay Raut In Meeting
हिंमत असेल तर शिवसेना सोडली हे जाहीर करा!

नाशिक येथे आज शिवसेना मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. आणदारांच्या बंडानंतर शक्तीप्रदर्शनासाठी हा मेळावा झाला. यावेळी उपनेते बबनराव घोलप, सुनील बागुल, संपर्क प्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड, जयंत दिंडे, अल्ताफ खान, भाऊ तांबडे, महागरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, विलास शिंदे, वैभव ठाकरे आदीसह विविध अंगीकृत संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

नाशिकची शिवसेना जागेवरच आहे, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य जागेवरच आहेत. मालेगाव नांदगाववाल्यांनी पाहून घ्या अशी सुरुवात करीत, श्री राऊत म्हणाले की, ४० आमदार म्हणजे शिवसेना नाही. १०० आमदार २५ खासदार निवडून आणायची क्षमता शिवसेनेत आहे. शिवसेना आमच्याच बापाची आहे. शिवसेनेशी गद्दारी सोपी नाही, शिवसेना ज्यांनी जन्माला घातली ते शिवसेनाप्रमुख आमचा बाप आहे. ही लढाई फक्त असली- नकली शिवसेनेची नसून सच्चाई विरुद्ध बेइमानीची आहे.

शिवसेना सोडल्याची प्रत्येक जण वेगवेगळी कारण देतो आहे, असे ते म्हणाले. हिंमत असेल तर उघडपणे सांगा की, आम्ही शिवसेना सोडली. उध्दव ठाकरे आजारी असताना महाराष्ट्र कोरोनाने आजारी असताना खोकेबाजानी घात केला आमदार व्हायची तरी लायकी होती का? असा प्रश्न करीत खोकेबाजीला ठोकेबाजीने उत्तर दिले जाईल. धनुष्यबाण शिवसेनेचाच असून महाराष्ट्रात आवाज पण शिवसेनेचाच राहीn, असा दावा त्यांनी केला.

ते म्‍हणाले की, साधा आमदार होण्याची लायकी नसलेल्या अनेकांना शिवसेना या नावामुळे मानसन्मान, प्रतिष्ठा मिळाली. हजारो शिवसैनिकांनी घाम गाळून ज्यांना मंत्री केले. ते खोकेबाजीसाठी गद्दार झाले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in