महाराष्ट्रातील ४३ शहरांमध्ये क्लायमेट प्लॅन तयार

महापालिका व वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूटमध्ये सामंजस्य करार
Aditya Thakre at Nashik NMC
Aditya Thakre at Nashik NMC Sarkarnama

नाशिक : नागरीकरणामुळे (Urbanisation) वेगाने वातावरणात बदल होत आहे. या बदलांमुळे हवेतील कार्बनचे (Carbon emission) प्रमाण वाढत असल्याने राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने ४३ शहरांमध्ये क्लायमेट प्लॅन तयार केला आहे. त्याच अनुषंगाने नाशिक (Nashik) महापालिका व वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूटमध्ये शुक्रवारी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thakre) यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

Aditya Thakre at Nashik NMC
विरोधकांना ओरडू दे, जनतेचा आमच्यावर विश्वास आहे!

महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या गंगापूर धरण येथील रेस्ट हाऊस मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव आदी उपस्थित होते. २०५० पर्यंत कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी ही मोहीम राबविली जात आहे. रेस टू झिरो उपक्रमाअंतर्गत सहभागी होणारे नाशिक हे पहिले नॉन मेट्रो शहर ठरले आहे. एनर्जी वेस्ट मॅनेजमेंट यासारख्या बाबींवर या माध्यमातून काम केले जाणार आहे.

Aditya Thakre at Nashik NMC
प्रविण दरेकरजी, टिका करण्या आधी थोडे शुद्धीत या!

पावसाच्या वेळेत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, तर हिवाळ्यात थंडीचे प्रमाणही वाढले आहे. हा वातावरणातील बदल कार्बनचे प्रमाण वाढत असल्याने होत आहे. त्यामुळे वातावरण कृती आराखडा अर्थात क्लायमेट प्लॅन करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिका व मुंबईस्थित एका संस्थेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. २०५० पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्बनचे प्रमाण कमी करणे हा प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी महापालिकेमध्ये समिती गठित केली जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन ग्रीन बिल्डींग उपक्रम राबवणे पाण्याचे स्रोत बळकट करणे हवेची गुणवत्ता सुधारणे आदी उपक्रम राबविले जाणार आहे

शाश्वत विकास करताना सर्व घटकांना बरोबर घेतले जाणार आहे. शहरांचे हिरवेगारपणा टिकविण्यासाठी वातावरण कृती आराखडा तयार केला जात आहे.

- आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com