नाना पटोलेंच्या दणका; शरद आहेर यांचे काँग्रेस शहराध्यक्ष पद गेले!

काँग्रेसच्या जयपूर विचारमंथनानंतर प्रदेश समितीला जाग आली.
Nana Patole & Sharad Aher
Nana Patole & Sharad AherSarkarnama

नाशिक : काँग्रेसचे (Congress) शहराध्यक्ष (Nashik) शरद आहेर (Sharad Aher) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जयपुर विचारमंथनांनतर याबाबत सुचना दिल्या होत्या. एक व्यक्ती, एक पद या तत्त्वानुसार प्रदेश उपाध्यक्षपदी मात्र सक्रिय राहणार असल्याचा खुलासा श्री. आहेर यांनी केला आहे. (State Congress committee instruct resignation having two posts at a time)

Nana Patole & Sharad Aher
रशीद शेख म्हणाले, आयुक्त जुम्मा के जुम्मा काम करतात!

नऊ वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्षपद सांभाळणारे शरद आहेर यांच्या राजीनाम्यासाठी यापुर्वीही अनेकदा मागणी झाली होती. मात्र जयपुर विचारमंथनानंतर प्रदेश समितीली जाग आल्याने दोन दोन पदांवर असलेल्या ५८ जणांची पदे धोक्यात आली होती.

Nana Patole & Sharad Aher
राज ठाकरेंनी कौतुक केलेले सलीम शेख बाद, शिवसेनेची मात्र चंगळ!

परंतु, पक्षाच्या जयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या चिंतन शिबिरात पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी केलेल्या ‘एक व्यक्ती एक पद’ या धोरणाचा उल्लेख प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिर्डी येथे सुरू असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या अधिवेशनात केला. त्यामुळे आपण या बैठकीतच श्री. पटोले यांच्याकडे शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचा खुलासा श्री. आहेर यांनी केला आहे. मात्र प्रदेश उपाध्यक्षपदी आपली नियुक्ती कायम असून यापुढे त्या पदावर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सध्या सुरू असलेल्या अधिवेशनानंतर महिला जिल्हाध्यक्षपद पदावर योग्य कार्यकर्त्यांची लवकरच निवड केली जाईल, असे त्यांनी सांगितले. अर्थात नवीन शहराध्यक्षांनी निवड होईपर्यंत श्री. आहेरच शहराध्यक्षपदाचा कारभार सांभाळतील, असे पक्षाच्या सूत्राने सांगितले.

नवा शिलेदाराबाबत उत्सुकता

पक्षाच्या विविध आंदोलनात सक्रिय असलेल्या शरद आहेर यांचा उत्तराधिकारी कोण, याबाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबरच अनेकांना उत्सुकता आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे नेते जुन्या जाणत्या कार्यकर्त्याला संधी देतात की कोरी पाटी असलेल्या कार्यकर्त्याला संधी देतात, याबाबत उत्सुकता आहे. तूर्त माजी उपमहापौर गुरमित बग्गा यांच्यासह शाहू खैरे, राजेंद्र बागूल, सेवादलाचे शहराध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर, माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, राहुल दिवे, शैलेश कुटे अशी काही नावे चर्चेत आहेत.

काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्‍नावर गत नऊ वर्षांत अनेक आंदोलने करत पक्षाला केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न केला. आता प्रदेश उपाध्यक्ष म्हणून चांगली कामगिरी करण्याचा मानस आहे.

- शरद आहेर, प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com