परमबीर सिंगांच्या नाशिकमध्ये जमिनी?; सिन्नरला नवा गुन्हा दाखल

बेपत्ता असलेल्या माजी पोलिस महासंचालक परमबीर सिंग यांचा गुप्तचर विभागाकडून शोध सुरू आहे.
परमबीर सिंगांच्या नाशिकमध्ये जमिनी?; सिन्नरला नवा गुन्हा दाखल
Parambeer Singh & Sachin PatilSarkarnama

नाशिक : संजय पुनूमिया (Sanjay Punumiya) ठाणे पोलिसांत दाखल गुन्ह्यात गजाआड आहे. त्यांना सिन्नर पोलिस (FIR file against Punumiya in Sinner police station) ठाण्यात दाखल गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. (Court given permission to take punumiya`s custody) त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात येईल. पुनूमिया हा बेपत्ता माजी पोलिस महासंचालक परमबीर सिंग (IG Parambeer Singh) यांचा व्यावसायिक भागीदार आहे का? हे संशयित पोलिसांच्या ताब्यांत आल्यानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिस अधिक्षक सचिन पाटील (SP Sachin Patil) यांनी सांगितले.

Parambeer Singh & Sachin Patil
परमवीर सिंग यांच्या नाशिकला समृद्धी महामार्गालगत बेनामी जमिनी?

बेपत्ता असलेल्या माजी पोलिस महासंचालक परमबीर सिंग यांचा गुप्तचर विभागाकडून शोध सुरू आहे. सोबतच नाशिकला त्यांची जमीन असल्याच्या तक्रारीवरून त्यांच्या भागीदारीच्या जमिनीचा शोध सुरू आहे.

पोलिसांकडे परमबीर सिंग यांच्या विरोधात करण्‍यात आलेल्या तक्रारीत त्यांची गुजरात येथील एकाच्या नावाने नाशिक जिल्ह्यात जमीन असल्याच्या तक्रारीची सध्या खात्री करून घेण्याचे काम पोलिस यंत्रणेकडून सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून संजय पुनूमिया हे त्यांचे भागीदार असून, पुनूमिया व परमबीर सिंग भागीदारीतून नाशिक जिल्ह्यात मालमत्ता घेतल्याची तक्रार आहे. त्या तक्रारीची खातरजमा करण्याचे काम राज्य गुप्तचर विभागाकडून सुरू असल्याचे समजते.

Parambeer Singh & Sachin Patil
सावध व्हा, आधी दुप्पट दर देतील, नंतर जनतेला नागवतील!

परमबीर सिंग यांच्या विरोधातील तक्रारीनुसार पुनूमिया याची इगतपुरी व सिन्नर तालुक्यात धामणगाव, मीरगाव पाथरे या भागात जमीन आहे. त्याविषयी पोलिस यंत्रणेकडून माहिती घेतली जात आहे. त्यानुसार सोमवारी (ता. ११) या भागात जाऊन जागेची, तसेच नोंदणी विभागात जाऊन यंत्रणेकडून माहिती घेण्यात आली. शेतजमीन घेण्यासाठी शेतकरी असणे, हा महाराष्ट्रात नियम आहे. पुनूमिया याने शेतजमिनीसाठी शेतकरी म्हणून दाखले दिले आहेत का, असल्यास तो शेतकरी आहे का, या आणि अशा विषयी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासी यंत्रणेकडून माहिती घेतली.

पुनूमियाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

संशयित संजय मिश्रीमल पुनूमिया यांनी स्वत: शेतकरी असल्याचा मौजे उत्तन (ता. जि. ठाणे) येथील शेती गटक्रमांक २०३/२४अ हा बनावट ७/१२ उतारा तयार करून त्याआधारे शेतकरी असल्याचे सिन्नर तालुका दुय्यम निबंधक कार्यालयास भासवून धारणगाव शिवारातील शेती मिळकत खरेदी घेऊन सदर मिळकतीतील संबंधित शेतकरी व शासनाची दिशाभूल व फसवणूक केली. अशी तक्रार दुय्यम निबंधक यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात सोमवार दिली. यावरून पुनूमियाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे तपास करीत आहेत.

...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in