Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक जळगाव दौरा; कारण काय?

Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानक जळगाव दौरा
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Eknath Shinde News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज सायंकाळी चार वाजता जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा हा दौरा अचानक जाहीर झाला, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे बडगुजर समाजाचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्या मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पाचोरा येथे येणार आहेत. तेथून मोटारीने चार वाजता लोहारा येथे कार्यक्रम स्थळी जातील. सायंकाळी ते मोटारीने जळगावात विमानतळावर येतील तेथून विमानाने मुंबई येथे रवाना होतील. भाजप (BJP) आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी याला दुजोरा दिला आहे.

Eknath Shinde
Congress; आगामी निवडणुकीत जळगाव शहरात काँग्रेसचा आमदार!

दरम्यान, या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री यांनी आपल्या जिल्हा भेटींमध्ये ठाकरे गटाला धक्का दिला आहे. त्यांचे अनेक पदाधिकारी गळाला लावले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्हा दौऱ्यावर मुख्यमंत्री येणार असल्याने काही प्रवेश होता का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde
Old Pension scheme : शिक्षक अन् पदवीधर निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांनी टाकला मोठा डाव; राजकीय पक्षांची केली कोंडी

मेळाव्यासाठी येण्याचे मुख्यमंत्र्यांचे काही नियोजन नव्हते. मात्र, हा ऐनवेळी दौरा ठरल्यामुळे अनेकांच्या भुव्या उंचावल्या आहेत. त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. मुख्मयंत्र्यांचा दौरा सकाळी जाहीर झाल्यामुळे प्रशासनाचीही धावपळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com