Jalgaon News: मुख्यमंत्री शिंदेंच्या दुसऱ्या अचानक पाचोरा दौऱ्याचे गौडबंगाल काय?

Eknath Shinde News : एकनाथ शिंदे यांचा अचानक झालेला हा दुसरा पाचोरा दौरा आहे.
Eknath shinde
Eknath shinde Sarkarnama

जळगाव : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अचानक झालेला दुसरा पाचोरा दौरा याचे नेमके गौडबंगाल काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे बडगुजर समाजाच्या मेळाव्यास उपस्थित राहिले. मात्र, त्यांचा हा कोणताही नियोजित दौरा नव्हता.

काल (ता.8) रोजी अचानक दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाचोरा येथे सायंकाळी 4 वाजता येत असल्याचे कळाले. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. तातडीने हेलिपॅड तयार करण्यात आले. पोलीस प्रशासन सुरक्षेसाठी कामाला लागले. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने आले आणि जळगाव विमानतळावरून रात्री विमानाने मुंबईला रवाना झाले.

Eknath shinde
Solapur News : भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्षांविरोधात कोर्टाने दिला कारवाईचा आदेश

एकनाथ शिंदे यांचा अचानक झालेला हा दुसरा पाचोरा दौरा आहे. या पूर्वी महाविकास आघाडीच्या काळात ते अचानक विमानाने पाचोरा येथे आले होते. विशेष म्हणजे हा कोणताही नियोजीत दौरा नव्हता जळगाव येथून मोटारीने ते पाचोरा येथे गेले येथील शिवसेनेचे आता शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या समवेत ते पाचोरा येथील मंदिरात गेले होते. तेथे त्यांनी पुजारी भेट घेतली पूजा केली आणि पुन्हा जळगाव येथून विमानाने मुंबईला रवाना झाले.

काही दिवसांपूर्वी राज्यात बंड झाले आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले. या बंडात पाचोरा येथील आमदार किशोर पाटील हे सुरवातीपासून होते. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे चार आणि एक पुरस्कृत आमदारही शिंदेंसोबत गेले. त्यामुळे कालच्या अचानक दौरऱ्याची चर्चा सुरू झाली आहे. बंडात साथ देणारे पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांच्यावर त्यांचे विशेष प्रेम असल्याचे सांगितले जात आहे.

Eknath shinde
NCB ची नोटीस येताच आमदार देशमुखांचा खळबळजनक आरोप; थेट मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा

दुसऱ्या विस्तारात किशोर पाटील यांना हमखास मंत्रीपदाची संधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. किशोर पाटील यानी आमंत्रण दिल्याने ते या मेळाव्यास उपस्थित राहिले. मात्र, ते अचानक का आले याचे मात्र गौडबंगाल कायम आहे. परंतु आमदार किशोर पाटील यांच्या विनंतीवरून ते आले याची चर्चा आहे. मात्र पुढील काळात होणाऱ्या राजकीय घडामोडीत ते समजून येईल हे मात्र निश्चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in