Lasalgaon APMC Result : मतदारसंघातील समितीत छगन भुजबळ यांचा पराभव!

आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत भुजबळांच्या पॅनलचा निसटता पराभव
Chhagan Bhujbal & Pandharinath Thore
Chhagan Bhujbal & Pandharinath ThoreSarkarnama

Chhagan Bhujbal defeated : आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीच्या निवडणुकीत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पॅनेलचा निसटता पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंढरीनाथ थोरे व भाजपचे डी. के. जगताप यांच्या पॅनेलला नऊ तर भुजबळ यांच्या पॅनलला आठ जागा मिळाल्या. स्वतःच्या मतदारसंघातील निवडणूक असल्याने छगन भुजबळ यांनी ती प्रतिष्ठेची केली होती. (Chhagan Bhujbal`s panel deafeted in Lasalgaon APMC election)

लासलगाव बाजार (Nashik) समितीत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पुढाकार घेऊन स्थानिक नेते जयदत्त होळकर, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांना बरोबर घेऊन पॅनल केले होते. परंतु राज्यभर (Maharashtra) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) प्रयोग होत असताना इथे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पंढरीनाथ थोरे यांनीच वेगळी चुल माडंली होती. त्याचा फटका भुजबळांना बसला.

Chhagan Bhujbal & Pandharinath Thore
Malegaon APMC : पालकमंत्री दादा भुसे यांना पराभवाचा धक्का; अद्वय हिरे जिंकले!

लासलगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी मतदान झाले. त्यात श्री. थोरे यांच्या पॅनलला ९, भुजबळ यांच्या पॅनलला ८ तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला. पंढरीनाथ थोरे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनेलचे विजयी उमेदवार असे, रमेश पालवे, डि. के. जगताप, पंढरीनाथ थोरे, राजेंद्र बोरगुडे, महेश पठाडे, बाळासाहेब दराडे, बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप, राजेंद्र डोखले, गणेश डोमाळे.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलला आठ जागा मिळाल्या. त्यातील विजयी उमेदवार असे, तानाजी आंधळे, श्रीकांत आवारे, सोनिया होळकर, जयदत्त होळकर, बाळासाहेब क्षिरसागर, संदीप दरेकर, भीमराज काळे, छबुराव जाधव. याशिवाय प्रवीण कदम हे अपक्ष उमेदवार विजयी झाले.

Chhagan Bhujbal & Pandharinath Thore
Sinnar APMC election : आमदार कोकाटेंच्या सत्तेला धक्का; वाजे, कोकाटेंना समान जागा!

लासलगाव बाजार समिती श्री. भुजबळ यांच्या येवला विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात येते. निफाड तालुक्यातील ४२ गावे येवल्याला जोडले आहेत. त्या गावांमुळे तसेच कांदा पिकाची सर्वात मोठी उलाढाल असलेली ही बाजार समिती आहे. महाविकास आघाडीचे पॅनल राज्यभरात होत असताना येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरीनाथ थोरे आणि राजेंद्र डोखळे यांनी मात्र भुजबळ यांच्या पॅनलऐवजी भाजपच्या डी. के. जगताप यांची मदत घेऊन पॅनेल केले. त्यात अनेक भुजबळ विरोधकांनी त्यांना उघड अन् पडद्यामागून मदत केली. त्यामुळे ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली. तीचा निकाल भविष्यात भुजबळांची अडचण वाढवू शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com