Chhagan Bhujbal News, Nashik News
Chhagan Bhujbal News, Nashik NewsSarkarnama

सत्तांतरानंतरही नाशिकमध्ये भुजबळांचेच ग्लॅमर अन् रुबाब!

मंत्रीमंडळ नसल्याने नाशिकचे अद्यापही पूरस्थितीबाबत छगन भुजबळच करताहेत धावपळ

नाशिक : जिल्ह्याचे (Nashik) पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आता माजी पालकमंत्री झाले. पण असे असले तरी, आजही श्री भुजबळ यांचा प्रशासनातील उठबस, मंत्र्याचा रुबाब हे सगळे कायमच असल्याचे चित्र आहे. मुसळधार पाऊस, गोदावरीचा पुर अशा स्थितीत सर्व लोकप्रतिनिधी निद्रीस्त असताना छगन भुजबळ मात्र नागरिकांच्या हितासाठी प्रशासनाला सतत विविध सुचना करीत सतर्क आहेत. (Chhagan Bhujbal took followup on Rain, Flood and people issues)

Chhagan Bhujbal News, Nashik News
मुख्यमंत्र्यांनी थोड ठाण्याच्या पुढेही यावं, खड्डे पहावे!

मंत्रिपद असून चालत नाही तर त्याचा प्रत्ययही यावा लागतो. अनेक मंत्री असले तरी त्यांची पकड दिसतेच असे नाही. पण काही नेते असे असतात की, मंत्रिपद असो अथवा नसो त्यांचा रुतबा, प्रशासनातील वचक मात्र कायम असतो.राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार जाऊन भाजप- बंडखोर शिवसेनेचे सरकार आले. सहाजिकच जुन्या सरकारमधील मंत्रिपद गेले. श्री भुजबळ हेही माजी मंत्री झाले. पण त्यांची प्रशासनावरील कमांड मात्र कायमच असल्याचा प्रत्यय आज आला.(Nashik Latest Marathi News)

Chhagan Bhujbal News, Nashik News
आमदार सुहास कांदेंना धक्का; गणेश धात्रक शिवसेनेचे झाले जिल्हाप्रमुख!

रुबाब कायमच

माजी मंत्री भुजबळ यांनी आज सकाळी दौरा करीत गोदावरी तीरावरील भागाचा दौरा केला. तेथे पुराने अडचणीत असलेल्या नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या दौऱ्यात गाड्यांचा ताफा, पत्रकारांचे कॅमेरे, कार्यकर्त्यांचे मोहळ आणि दौऱ्यातील रुतबा मात्र कायमच दिसला. पूरग्रस्त भागाला भेटी दिल्यानंतर त्या भागातील नागरिकांच्या अडचणी ऐकल्यानंतर थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. श्री भुजबळ जिल्हाधिकारी कार्यालयात येणार हे समजताच येथील यंत्रणा हलली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील पोर्चमधील जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन हलले. त्यानंतर काही वेळातच श्री भुजबळ यांचे वाहनासाठी जागा मोकळी केली गेली.

वाहनांचा ताफा

आमदार भुजबळ यांच्या सोबत तीन चार वाहनांचा ताफा, पोलिसांच्या वाहनाचा ताफा होता. जणू विद्यमान पालकमंत्र्यांची बैठकच असावी असा वातावरणात फिल तयार झाला. श्री भुजबळ यांनी बैठक न घेता केवळ जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांच्या केबिनमध्ये जाऊन तेथे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांसोबत नुसती चर्चा केली. देवगावसह काही भागातील नागरिकही त्यांचे प्रश्न घेऊन आले होते. त्यांच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे आमने सामने करीत भुजबळ यांनी या सगळ्या अर्धा ते पाऊण तासाच्या घटनाक्रमात मात्र मंत्री नसूनही त्यांच्यातील मंत्र्याचा रुतबा, प्रशासनावरील पकड, लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठीची चिकाटी याचे दर्शन घडवले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in