टोल विरोधात छगन भुजबळ मैदानात...तर टोल बंद करणार!

नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरावस्थे वरून छगन भुजबळ आक्रमक
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : नाशिक (Nashik) मुंबई (Mumbai) महामार्गाची (Highway) अवस्था अत्यंत बिकड जाली आहे. तीन तासांचे अंतर कापण्यासाठी आठ ते दहा तास लागतात. त्याचा अनुभव खुद्द छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी घेतला आहे. त्यामुळे या महामार्गाची पाहणी करून त्यांनी दहा दिवसांत रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा १ नोव्हेंबर पासनू टोल बंद (Toll)करण्याचा इशारा दिला आहे. (Chhagan Bhujbal experience people issue of National Highway)

Chhagan Bhujbal
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरूर यांच्या चार तक्रारी काय?

या संदर्भात ते म्हणाले, ३१ ऑक्टोबरपर्यंत नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा झाली नाही तर १ नोव्हेंबरपासून टोल बंद करणार. त्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत केली नाशिक मुंबई महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी केली.

Chhagan Bhujbal
खालच्या पातळीवर बोलाल तर हल्ले होणारच : नितेश राणेंची प्रतिकीया!

भुजबळांनी महामार्ग प्राधिकरणाच्याअधिकाऱ्यांना नाशिक मुंबई महामार्गावरील खड्डे दाखवून अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. ते म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने या समस्यांची तातडीने दखल घ्यावी. रस्ते दुरुस्त करावेत. लोकांच्या संयमाचा अंत पाहू नये.

३१ ऑक्टोबरपर्यंत नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा झाली नाही तर १ नोव्हेंबरपासून टोल बंद करण्याचा इशारा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना देत लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका असा सज्जड दम त्यांनी दिला.

छगन भुजबळ यांनी आज नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते वडपे दरम्यान मुंबई महामार्गावरील रस्त्याची पाहणी करत अधिकाऱ्यांची कानउघडनी करत फैलावर घेतले.

यावेळी नॅशनल हायवेचे प्रकल्प अधिकारी साळुंखे, गोंदे ते पडघा टोलवेज पीक इंफ्रा कंपनीचे संचालक आनंद सिंग, माजी आमदार शिवराम झोले, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबई आग्रा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अनेकांना अपघातात आपला प्राण गमवावा लागला. याबाबत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच नॅशनल हायवे यांना याबाबत पत्र व्यवहार केला आहे. मात्र अद्यापही रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे असल्याने आज छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांनी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते इगतपुरी दरम्यान रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना ३१ ऑक्टोबर पर्यंत रस्त्यांवरील खड्डे न बुजविल्यास १ नोव्हेंबर पासून टोल बंद करण्याचा दिला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com