छगन भुजबळांनी उचलला साहित्य संमेलन सर्वात्कृष्ट करण्याचा विडा!

नाशिक येथे एमइटी संकुलात पुढील महिन्यात अ. भा. साहित्य संमेलन होत आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (94th All india Marathi Literature confrence) हे सर्वार्थाने उत्कृष्ट आणि संस्मरणीय होईल असा विश्वास या संमेलनाचे स्वागताध्यक्ष, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. साहित्य संमेलनाच्या तयारीत भुजबळ यांनी चांगलेच लक्ष घातल्याने विविध यंत्रणा सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे संमेलन यशस्वी करण्याचा विडा यानिमित्ताने भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उचलला आहे.

Chhagan Bhujbal
गिरीश महाजनांनी अद्वय हिरेंकडे नेतृत्व सोपवून `राष्ट्रवादी`ला साईड ट्रॅक केले

संमेलनाच्या विविध समित्यांच्या सदस्यांच्या सभा संमेलन स्थळ कुसुमाग्रज नगरी, भुजबळ नॅालेज सिटी येथे तयारीच्या दृष्टीने झाल्यानंतर उपस्थितांना ते करीत होते.

ते म्हणाले, पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निफाडचे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते. याची आठवण जागवत कुसुमाग्रज नगरीत होणारे हे संमेलन सर्व बाबतीत उच्च दर्जाचे व्हावे यासाठी आपण कंबर कसली आहे. हे आजच्या आपल्या मोठ्या सहभागावरुन दिसून येते. ही आश्वासक बाब आहे. संमेलन आधी गोखले एज्युकेशन सोसायटी प्रांगणात होणार होते. तेथेही आपल्याला त्यांचे सहकार्य मिळाले होते. त्याबद्दल आपण आभारी आहोत. आता संमेलन भेट भुजबळ नॅालेज सिटी येथे घेण्याचा निर्णय झाला. त्यामुळे कमी वेळात वेगाने आपल्याला तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी सर्व सहकार्य मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Chhagan Bhujbal
माझ्याकडे १८, १९ रेड झाल्या, रेड वेळी पत्नी नातवांसह दिवसभर मॅालमध्ये बसून रहायची!

नाशिक महानगरातील चहुबाजूने लोकांना येता येईल यासाठी बसेसची व्यवस्था केली असून मोठ्या संख्येने नागरिकांनी संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

कोणतेही काम हातात घेतले की, ते सर्वोत्कृष्ट करायचे हा स्वागताध्यक्ष श्री भुजबळ यांचा स्वभाव असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे संमेलन यशस्वी करु आणि संमेलन घ्यावे ते नाशिककरांनी असे सर्व म्हणतील असे करु असे आवाहन कुसुमाग्रज यांची आठवण जागवत कार्याध्यक्ष श्री हेमंत टकले यांनी केले.

समिती समन्वय विश्वास ठाकूर यांनी स्वागत केल्यावर प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी प्रास्ताविकातून कामाचा आढावा घेतला. सर्व नाशिककरांचे हे संमेलन यशस्वी करण्यासाठी झटून प्रयत्न करु अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुख्य समन्वयक, माजी खासदार समीर भुजबळ यांनी सर्व समित्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करुन एकूण आखणी केली जाईल. सर्वांनी ही सामुहिक जबाबदारी उत्तमरितीने पार पाडू असे विचार व्यक्त केले. सहकार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी लोकहितवादी मंडळाचे व संमेलन पदाधिकारी, समिती प्रमुख आणि सदस्य उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com