त्या मावशींचे शिवभोजन घेऊन छगन भुजबळ झाले तृप्त

महाविकास आघाडीच्या योजनांमध्ये गरीबांसाठी शिवभोजन एक महत्त्वाची योजना आहे.
Chhagan Bhujbal at Shivbhojan centre
Chhagan Bhujbal at Shivbhojan centreSarkarnama

नाशिक : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Front Government) योजनांमध्ये गरीबांसाठी शिवभोजन एक महत्त्वाची योजना आहे. काल नागपूरच्या दौऱ्यावर असलेल्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भिवापूर येथे शिवभोजनाचा फलक पाहिला आणि भोजन घेतले. तेथील भोजन त्यांना एव्हढे आवडले ते तृप्त झाले.

Chhagan Bhujbal at Shivbhojan centre
एकनाथ खडसेंच्या कुटुंबात महाभारताचा पहिला अध्याय लवकर सुरु झाला!

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सध्या दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. या दरम्यान त्यांनी या शिवभोजन केंद्राला भेट दिली. सामान्यतः मंत्री आले म्हणजे त्यांच्यासमवेत कार्यकर्ते, आमदार, नेते असतातच. यावेळी देखील श्री. भुजबळ यांच्या समवेत स्थानिक आमदार राजू पारवे यांसह विविध कार्यकर्ते होते.

Chhagan Bhujbal at Shivbhojan centre
मंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, आमचे द्राक्ष शेतकरी, जगात भारी!

श्री. भुजबळ स्वतः जेवायला बसल्यावर केंद्र चालविणाऱ्या त्या मावशींनीही अतिशय उत्साहाने त्यांना जेवन वाढले. यावेळी परिसरातील नागरिकांनीही उत्सुकता म्हणून गर्दी केली. जेवन झाल्यावर भुजबळांनी नागरिकांशी संवाद साधला. जाताना त्यांनी केंद्र चालविणाऱ्या त्या मावशींना जेवनाचा दर्जा असाच टिकवून ठेवा, अशी सूचनाही केली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com