छगन भुजबळ लागले महापालिका निवडणुकीच्या तयारीला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत छगन भुजबळ यांनी आगामी महापालिका निवडणुकांसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (NMC election) निवडणुकांना स्थगिती असली तरी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला (Local elections) सामोरे जावे लागणार असल्याचे सूचक विधान केले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अधिकाधिक सदस्य निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले. (Chhagan Bhujbal appeal NCP office bearers for strong prepration for NMC election)

Chhagan Bhujbal
ठाकरे गटाच्या प्रकाश वाजेंच्या वाढदिवसाला दादा भुसेंची साखरपेरणी चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये श्री. भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हा व शहर कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या निमित्ताने आगामी महापालिकेच्या निवडणुकांची चाहुल लागल्याचे संकेत मिळाल्याने छगन भुजबळ निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

Chhagan Bhujbal
नाशिकला आक्रमक शिवसेनेची चक्क गांधीगिरी

या वेळी ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्या दृष्टीने तयारी करून आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपालिका बाजार समिती व इतर संस्थांवर जास्तीत- जास्त उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आणण्यासाठी नियोजन करा, असे आवाहन केले.

श्री. भुजबळ यांनी या वेळी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला. ते म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवले जात नसतील तर नागरिकांचे हितासाठी आंदोलन उभे करावे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील प्रत्येक विभागात व ग्रामीण भागात तालुकानिहाय एक दिवसीय शिबिराचे आयोजन करावे. पक्षाची सभासद नोंदणी वाढवावी. पदवीधर मतदारसंघासाठी जास्तीत- जास्त मतदार नोंदणी करावी.

समतेचा विचार पोचवा

जाती-धर्माच्या वादात न पडता नागरिकांमध्ये समतेचे विचार पोचवण्याचे काम करावे. देशातील सत्ता मोजक्या धर्मांध लोकांच्या हाती गेली असून हे लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे. विविध संस्थांवर एका विशिष्ट वर्गातील प्रतिनिधी प्रतिनिधित्व करत आहे. या संस्थांवर बहुजन समाजातील प्रतिनिधी निवडून द्यायला हवेत. सिनेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पक्षाची प्रतिनिधी निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, कार्याध्यक्ष विष्णुपंत मंजुने, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, अर्जुन टिळे, अनिता भामरे, माजी आमदार जयवंतराव जाधव, अशोक सावंत, संजय चव्हाण, शिवराम झोले, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in