छगन भुजबळ म्हणतात, `मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती`

अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : मी १९९९ मध्ये काँग्रेस पक्ष सोडला. (i have leave congress in 1999) तेव्हा काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून आपणास मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती. (At that time they given me a CM Post Offer) मात्र ओबीसींचा विचार करून मी शऱद पवार यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेलो, असे राज्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal
गगन भरारीचे ‘ध्येय’ असणारे पंचाहत्तरीचे तरुण

अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आपल्या आजवरच्या राजकीय वाटचालीचा विचार करता, माझ्यासमवेत काम केलेले सहकारी मुख्यमंत्री झाले. केंद्रात मंत्री झाले. माझ्या वाटेला ते आले नाही. विचार केल्यावर त्याची खंत वाटते, अशी सल त्यांनी व्यक्त केली.

Chhagan Bhujbal
राष्ट्रवादी काँग्रेस महापौरांच्या घरापुढे खोदणार खड्डे!

ते म्हणाले, बालपणापासून मी शिवसेनेत काम केले. अनेक स्तरांवर आक्रमककपणे लढलो. राजकीय विषयांवर जीथे गरजेचे होते, तेथे लाभ, नुकसानीचा विचार न करता थेट भूमिका घेतली. त्यामुळे ओबीसी बाबत भूमिका घेण्याचा विचार करताना मी शिवसेना सोडली. त्यावेळी ते सोपे नव्हते. मात्र मी निर्णय घेतला. त्यासाठी शिवसेनेतील काही मंडळींनी देखील मला भूमिका घेण्यासाठी मदत केली. यावेळी केंद्रात पंतप्रधान व्ही. पी. सिंग पंतप्रधान होते. त्यांनी मला दिल्लीत बोलावून घेतले. या प्रश्नावर चर्चा केल्यावर त्यांनी माल ओबीसींचे राष्ट्रीय नेतृत्व करण्याची सूचना केली. मात्र मला ते प्रशस्त वाटले नाही. मी नकार दिली. त्यावेळी देखील माझी निष्ठा शरद पवार यांच्याशी होती.

शरद पवार यांनी मला आजपर्यंत उपमुख्यमंत्री, मंत्री केले, असे भुजबळ यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांनी मला मंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेण्याची संधी दिली.

शरद पवार काँग्रेसपासून वेगळे होत त्यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. तेव्हा मी अगदी सुरवातीलाच व उघडपणे त्यांच्याबरोबर गेलो, असे भुजबळ यांनी सांगितले. ते म्हणाले, यावेळी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी माझे मन वळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची संधी देऊ असे सांगितले होते. कदाचीत मी मुख्यमंत्री देखील झालो असतो. मात्र मी ती संधी नाकारली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com