छगन भुजबळांची प्रतिज्ञा; एक थेंब पाणीही गुजरातला देऊ देणार नाही!

नाशिक, मराठवाड्याचा तुटवडा दुर करण्याचे सुरु केले नियोजन.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : महाराष्ट्राच्या भूमीवर पडलेला प्रत्येक थेंब पूर्वेकडे वळविला जाईल. आपल्याकडचे जे पाणी गुजरातला जात आहे ते आपल्याकडे आणले तर नाशिकचाच नाही तर मराठवाड्याचा देखील प्रश्न सुटेल. त्यामुळे एक थेंब देखील महाराष्ट्रातून गुजरातला देऊ देणार नाही असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal
डॉ. आंबेडकरांनी फक्त घटनाच नाही तर देशाला दिशा देण्याचे काम केले.

खेडगाव (दिंडोरी) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयच्या नूतन इमारतीचा उदघाटन व ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे (Shreeram Shete) यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते.

श्री. भुजबळ यावेळी म्हणाले, संपूर्ण पैसे दिल्याशिवाय शेतकऱ्यांच्या जमिनीला कोणी हाथ लावणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू. जिल्ह्यातील बंद साखर कारखाने सुरू करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal
`ती` बाई स्वातंत्र्याला भीक म्हणाली, तेव्हा साहित्यिक गप्प कसे बसले?

श्री. भुजबळ म्हणाले की, राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रातील एक अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची विशेष श्रीराम शेटे ओळख आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक, कृषी क्षेत्रात त्यांचा दबदबा असून राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात अनेक कार्यकर्ते घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जडणघडणीत देखील त्यांचा बहुमुल्य वाटा असून नाशिक जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. जिल्ह्यातील कृषी आणि सहकार क्षेत्रात त्यांनी अतिशय महत्वपूर्ण कामे केलेली आहे. नाशिक जिल्ह्यात सहकारी तत्वावर कादवा सहकारी साखर कारखाना अतिशय यशस्वीपणे सुरु राहण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे.

कादवा सहकारी साखर कारखाना ज्या परिस्थिती मध्ये त्यांनी घेतला आणि तो जिथे नेऊन ठेवला ते महत्वपूर्ण आहे. जिल्ह्यातील सर्व बंद केलेले कारखाने सुरू करण्यासाठी श्रीराम शेटे याना सल्लागार म्हणून नियुक्ती करावी असे सांगत श्रीराम शेटे हे नेहमी एकनिष्ठपणे पवार साहेबांच्या सोबतच राहिले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. नरहरी झिरवाळ यांच्या रूपाने अभ्यासू उपाध्यक्ष सभागृहाला मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, डॉ.तुषार शेवाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार श्रीनिवास पाटील, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस निलिमाताई पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सुधीर तांबे, आमदार नितीन पवार, आमदार दिलीप बनकर, आमदार सरोज आहिरे, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार संजय चव्हाण, मारोतीराव पवार, शिरिषकुमार कोतवाल, नानासाहेब बोरस्ते, माणिकराव बोरस्ते, उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in