पोलिस, हिंदुत्ववादी संघटनांच्या वादात भुजबळांची मध्यस्थी!

Nashik : पोलिस गुढीपाडव्यांच्या कार्यक्रमांना देणार परवानगी.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : हिंदुत्ववादी संघटनांकडून गुढीपाडव्याला (Gudhipadwa) नववर्ष स्वागत यात्रा (Marathi new year) व कार्यक्रम करण्यात येणार आहेत. त्यातील काही पदाधिकारी व कार्यक्रम याबाबत खुलासा मागीतल्याने या संघटनांनी पोलिस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pande) टीका केली होती. या वादात परवानग्या रखडल्या. आता त्यात पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मध्यस्थी केल्याने परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Chhagan Bhujbal
संपकरी आक्रमक होताच `अदानी`च्या अभियंत्यांनी वीज केंद्र सोडले!

मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सांस्कृतीक कार्यक्रमांच्या काही संस्थाच्या कार्यक्रमांना परवानग्या देण्याच्या वादात आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मध्यस्थी केली. पोलिस आयुक्त दीपक पांडे व नववर्ष स्वागत समिती अध्यक्ष प्रफूल्ल संचेती यांच्यातील वादानंतर पोलिस आयुक्तांसोबत बैठकीनंतर आज भुजबळांनी सगळ्या कार्यक्रमांना परवानग्या मिळतील, असे स्पष्ट केले.

Chhagan Bhujbal
रामराजे निंबाळकर म्हणाले, बिल्डरांवर गुन्हे दाखल करा!

आज बुधवारी श्री भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यात, गुढीपाडव्यानिमित्त पोलिसांकडे आलेल्या शहरातील प्राप्त अर्जानुसार कार्यक्रमांना पोलीस परवानगी दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

आरोप-प्रत्यारोपामुळे बैठक

सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे नियोजन करणाऱ्या आयोजकांना चर्चेस बोलवले तरी ते येत नाही. चर्चा न करताच परवानगी मागत आहेत. ते आजीबात संयुक्तिक नसल्याचे पांडे यांनी सांगितले.

सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करताना नाशिक शहर पोलीस आयोजकांना विविध कागदपत्रांची मागणी करतात. त्यातून आयोजक आणि पोलिसांमध्ये वाद होत आहेत. शहरातील विविध कार्यक्रमांना पोलीस परवानगी देताना टाळाटाळ केली जात असल्याचा आयोजकांचा आरोप होता. गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत यात्रा समितीने पाच दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या परवानगीसाठी अडवणूक होत असल्याचा आरोप केला होता.

श्री भुजबळ यांनी आज बुधवारी (ता.३०) भुजबळ फार्मवर बैठकीत पालकमंत्री आणि पोलीस आयुक्तांमध्ये नववर्ष स्वागत कार्यक्रमांना पोलीस परवानगी देण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर संयुक्तपणे पत्रकारांशी बोलतांना पोलीस आयुक्तांनी परवानगीसाठी येणाऱ्या सर्व अर्जदार व्यक्ती व संस्थांना परवानगी देणार आहे असे स्पष्ट केले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com