Chhagan BHujbal: महामार्गावरील खड्डे आठ दिवसांत बुजवणार!

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघातील जलसंधारण प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेतला.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : येवला (Yeola) मतदारसंघातील विविध जलसंधारणाचे (Irrigation projects) प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावेत. शेतीचे (Agreeculture) प्रश्न सोडविण्यासाठी या प्रकल्पांना गती देण्याची गरज आहे. याबाबत प्रशासनाने प्रशासकीय स्तरावर जलदगतीने आवश्यक प्रक्रीया पूर्ण करावी, अशा सुचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जलसंधारण अधिकाऱ्यांना दिल्या. (Chhagan Bhujbal take a riview of various projects of Yeola)

Chhagan Bhujbal
Nashik News: शरद जोशी यांनी शेतकऱ्यांना लढायला शिकवले

आपल्या मतदारसंघातील कोटा बंधारा महालखेडा, साठवण तलाव सावरगाव, साठवण तलाव ममदापूर (मेळाचा बंधारा), साठवण तलाव देवना त्याचबरोबर प्रस्तावित साठवण तलाव राजापूर (वडपाडी) व साठवण तलाव जायदरे (आडनदी) या प्रकल्पासह बंधारे दुरुस्तीची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Chhagan Bhujbal
MVP Election: छगन भुजबळांकडून मविप्र पदाधिकाऱ्यांचा सत्कार

येवला मतदारसंघातील जलसंधारणांच्या कामाबाबत आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी छगन भुजबळ यांनी येवला मतदार संघातील कोटा बंधारा महालखेडा, साठवण तलाव सावरगाव, साठवण तलाव ममदापूर (मेळाचा बंधारा), साठवण तलाव देवना,प्रस्तावित साठवण तलाव राजापूर (वडपाडी) साठवण तलाव जायदरे (आडनदी) या प्रकल्पासह बंधारे दुरुस्ती व प्रस्तावित दुरुस्तीच्या कामांचा आढावा घेतला. कोटा बंधारा महालखेडा या बंधाऱ्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर पूर्वी या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

निफाड तालुक्यातील साठवण तलाव सावरगाव या प्रकल्पासाठी ११ कोटी ८० लक्ष रुपये निधी प्राप्त असून या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून सहा महिन्यात या प्रकल्पासाठी पुन्हा सुप्रमा घेऊन डिसेंबर २०२३ पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी सदरच्या कामात दिरंगाई न होता हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे असे सूचना छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी राजेंद्र काळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते, उपविभागीय जलसंधारण अधिकारी शेख, जलसंधारण अधिकारी बाळासाहेब डोळसे, प्रियंका भडके, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

महामार्गावरील खड्डे बुजवा

मुंबई नाशिक महामार्गाची खड्ड्यांमुळे दुरावस्ता झाल्याने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथील कार्यालयात नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या प्रकल्प संचालकांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. तसेच यावेळी त्यांनी नॅशनल हायवे ॲथोरिटी‌च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत सदर रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी अशा सूचना केल्या. यावेळी आठ दिवसांच्या आत नाशिक मुंबई महामार्गावरील सर्व खड्डे पूर्णपणे बुजवले जातील अशी माहिती अधिकाऱ्यांनी भुजबळ यांना दिली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, एनएचआयचे प्रकल्प संचालक बी. एस. साळुंखे आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in