अशोक चव्हाण, थोरातांना जमेना, ते नाना पटोलेंनी करून दाखवले!

शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष पद अंतर्गत भांडनामुळे अनेक वर्षे रिक्त आहे.
Nana Patole, Prithviraj Chavan, Balasaheb Thorat & Ashok Chavan.
Nana Patole, Prithviraj Chavan, Balasaheb Thorat & Ashok Chavan.Sarkarnama

नाशिक : शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष पद अंतर्गत भांडनामुळे अनेक वर्षे रिक्त आहे. पृथ्वारीज चव्हाण, (Prithviraj Chavan) अशोक चव्हाण, (Ashok Chavan) बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) असे तीन प्रदेशाध्यक्ष झाले, मात्र नाशिकला एक शहराध्यक्ष कोण याचा निर्णय ते करु शकले नव्हते. नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी मात्र एका झटक्यात हा प्रश्न सोडवला. त्यामुळे जे चव्हाण, थोरातांना जमेना ते पटोलेंनी करुन दाखवले.

Nana Patole, Prithviraj Chavan, Balasaheb Thorat & Ashok Chavan.
राजेश टोपेंना सवाल, `महाराष्ट्रात ७० टक्के गरोदर मातांचे सिझेरियन का होते?`

शहर आणि जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती अतिशय नाजुक आहे. त्याला पक्षातील गटबाजी कारणीभूत ठरली. शहराध्यक्षपदी जो असेल किंवा ज्याचे नाव चर्चेत येईल त्याला विरोध करणे यालाच नेत्यांनी पक्षाचे काम अशी समजूत करून घेतली. इच्छुकांच्या `मला नाही तर कोणालाच नाही` या टोकाच्या गटबाजीमुळे पक्षाची स्थिती नाजुक झाली आहे. गेले सात वर्षे ओझरचे (निफाड) शरद आहेर प्रभारी अध्यक्ष आहेत. तसा त्यांचा शहराशी संबंध नाही, मात्र त्यांना या पदावर काम करावे लागते आहे.https://www.youtube.com/watch?v=7pIJ9_j5eDU

Nana Patole, Prithviraj Chavan, Balasaheb Thorat & Ashok Chavan.
Good News...कोरोना नियंत्रणात...दुकाने, हॅाटेल्स रात्री १२ पर्यंत सुरु!

एकेकाळी स्वबळावर सत्ता असलेल्या जिल्हा परिषद, महापालिकेत या पक्षाच्या सदस्यांची संख्या सिंगल डिजीट झाली. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणूकांच्या तयारीला शहरातील सर्व पक्ष जोमाने कामाला लागले आहे. मात्र काँग्रेस निद्रीस्तच दिसते. पदाधिकारी शहर अध्यक्ष नियुक्तीची वेळ येताच जोमाने गटबाजी सुरु करतात. नुकत्याच झालेल्या प्रदेश कार्यकारीणीत येथील अकरा जणांना स्थान मिळाले. परंतु जिल्ह्यात बालेकिल्ला असलेल्या मालेगावला पक्षाचे माजी आमदार आसीफ शेख यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. माजी आमदार रशीद शेख त्याच मार्गावर आहेत. तेव्हा यातील एकही प्रदेश पदाधिकारी दिसला नाही, अशी तक्रार राजीनामा दिलेले माजी आमदार रशीद शेख यांनी केली आहे. त्यांच्या मते जनमानसात स्थान नसेलेले पदाधिकारी होतात. लोकांमध्ये ज्यांना स्थान आहे त्यांची पक्ष उपेक्षा करतो.

या पार्श्वभूमीवर नुकतीच मुंबईत नुकतीच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाशिकच्या पदादिकाऱ्यांची बैठक घेतली. महापालिका निवडणूक व शहराध्यक्षांची नियुक्ती याबाबत त्यात चर्चा झाली. त्याला माजी आमदार जयप्रकाश छाजेड, माजी मंत्री डॅा शोभा बच्छाव, शैलेश कुटे, नगरसेवक शाहू खैरे, प्रदेश सरचिटणीस डॅा हेमलता पाटील, नगरसेवक राहूल दिवे असे विविध समर्थक त्यासाठी इच्छुक म्हणून नावे घेतली गेली. मात्र एकमत होण्यासाठी तोडगा निघाला नाही. तेव्हा प्रदेशाध्यक्षांनी अध्यक्षांची नियुक्ती एक दोन दिवसांतच करणार हे स्पष्ट केले. कोणाला नियुक्त करायचे हा माझा अधिकार आहे. त्याला कोणीही विरोध केला, माध्यमांकडे बातम्या झाल्या तर माझ्याशी गाठ आहे. अतिशय कडक कारवाई करीन अशी तंबीच दिली. त्यामुळे शहराध्यक्षांच्या नियुक्तीची शक्यता निर्माण झाली. गेली सात वर्षे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे तीन प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांच्याकडे हा विषय गेला. मात्र पारंपारीक काँग्रेसच्या धोरणाने निर्णय घेणे व नेमस्त वृत्ती यामुळे ठोस निर्णय न घेता त्यांनी मतैक्यावर भर दिल्याने त्यांना ते जमले नाही. नाना पटोले यांच्या धडाकेबाज भूमिकेने मात्र ते करुन दाखवले अशी स्थिती आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com