धुळे बँकेत पहिल्यांदाच शिवसेनेच्या गटाच्या चार संचालकांची एंट्री!

धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा निवडणुकीचा सोमवारी निकाल जाहीर झाला.
धुळे बँकेत पहिल्यांदाच शिवसेनेच्या गटाच्या चार संचालकांची एंट्री!
Chandrakant Raghuwanshi & Sharad PatilSarkarnama

नंदुरबार : धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या चार संचालकांनी एन्ट्री केली आहे. हे संचालक बॅंकेच्या व्‍यवस्थापनावर वॉच ठेवून व्यवहार सुरळीत करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील, तसेच स्वतंत्र नंदुरबार जिल्हा बॅंकेसाठी प्रयत्नशील राहू, असे मत शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केले.

Chandrakant Raghuwanshi & Sharad Patil
गनिमी कावा...माघार घेतलेल्या महाजन विजयी अन् पराभूताला स्वतःचे मतही नाही!

धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा निवडणुकीचा सोमवारी निकाल जाहीर झाला. त्यात यापूर्वीच शिवसेनेचे आमशा पाडवी यांची बिनविरोध निवड झाली आहे. रविवारी झालेल्या मतदानातून स्वतः चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार शरद पाटील, धडगावचे संदीप वळवी हे विजयी झाले. शिवसेनेने या संचालकांच्या माध्यमातून जिल्हा बॅंकेत एन्ट्री केली आहे. असे असले तरी जर महाविकास आघाडीचा धर्म आघाडीतील पक्षांनी पाळला तर महाआघाडीकडे बॅंकेचे सूत्रे जाऊ शकतात. मात्र आता पुढील खेळी काँग्रेसवर अवलंबून आहे.

Chandrakant Raghuwanshi & Sharad Patil
माजी मंत्री सुभाष भामरेंच्या भावाचा दारूण पराभव: काँग्रेसच्या शरद पाटलांचा दणका

महाआघाडी धर्म न पाळल्यास काँग्रेसने भाजपला समर्थन दिल्यास बॅंकेची सूत्रे भाजपच्या हातात राहतील. असे असले तरी शिवसेनेचे चार संचालक बॅंकेचा कारभार सुरळीत करण्यासाठी नक्कीच महत्त्वाचे दुवा ठरतील. गैर कारभारावर वॉच ठेवतील, एवढे मात्र नक्की. तसेच या बॅंकेचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा स्वतंत्र बॅंक निर्माण करण्याची मागणी यापूर्वी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी लावून धरली होती. मात्र आता ती मागणी जोमाने राहणार आहे.

---

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in