`आमचं ठरलय, भाजपसोबत जाणार नाही`

धुळे, नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माघारीनंतरच चित्र स्पष्ट होईल.
Chandrakant Raghuwanshi, Shivsena leader
Chandrakant Raghuwanshi, Shivsena leaderSarkarnama

नंदुरबार : धुळे- नंदूरबार जिल्हा बँकेच्या (Dhule, Nandurbar District Bank) विभाजनासाठी प्रयत्न कमी पडले. विभाजनानंतरच निवडणूक घेण्याची मागणी होती. बँकेची निवडणूक स्थानिक पातळीवर लढविली जात असल्याने सहसा वरिष्ठ नेते यात दखल घेत नाहीत. महाविकास आघाडी नेत्यांना मान्य असून, जिल्हास्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. भाजपसोबत जायचे नाही, (Do not go with BJp) असे स्पष्ट आदेश वरिष्ठांनी दिल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuwanshi) यांनी सांगितले.

Chandrakant Raghuwanshi, Shivsena leader
धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अमरीशभाईंच्या जाळ्यात अडकली?

धुळे, नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माघारीनंतरच चित्र स्पष्ट होईल. सन्मानाने सर्वपक्षीय पॅनल तयार झाल्यास निवडणूक लढण्यास हरकत नाही. मात्र, प्रथम प्राधान्य महाविकास आघाडीलाच असेल, असे मत माजी आमदार रघुवंशी यांनी व्यक्त केले.

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची रणधुमाळी सुरू आहे. शनिवारी नंदुरबार जिल्ह्यातून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह त्यांच्या गटातून नामांकन दाखल करण्यात आले. या पार्श्वभूमीवर श्री. रघुवंशी म्हणाले, की महाविकास आघाडी झाली, तर त्याच माध्यमातून निवडणूक लढविली जाईल. काँग्रेस महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे. पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी व आमदार कुणाल पाटील आघाडीचे नेतृत्व करीत आहेत. आघाडी झाली, तर त्याच माध्यमातून निवडणूक लढवू. सर्वपक्षीय निवडणूक लढविण्यास अडचण नाही; परंतु प्रथम प्राधान्य महाविकास आघाडीलाच असेल, असे स्पष्ट मत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com