चंद्रकांत पाटील म्हणतात, राऊत यांनी माझी तपासणी करावी, मी राऊतांचे डोके तपासतो!

चंद्रकांत पाटील आणि खासदार संजय राऊत यांच्यातील वादाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता दिसत नाही.
चंद्रकांत पाटील म्हणतात, राऊत यांनी माझी तपासणी करावी, मी राऊतांचे डोके तपासतो!
Chandrakant Patil & Sanjay RautSarkarnama

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यातील वादाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता दिसत नाही. श्री. पाटील यांनी काल येथे `मी संजय राऊत यांचे डोके तपासतो` असे म्हटल्याने हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Chandrakant Patil & Sanjay Raut
देवेंद्र फडणवीस यांचे संकेत, एस. टी. कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण अशक्य

भारतीय जनता पक्षाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या कन्येच्या विवाहासाठी श्री. पाटील येथे आले होते. यावेळी खासदार राऊत यांनी कृषी कायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागे घेतला. याबाबत पंतप्रधानांनी केलेल्या विलंबाबाबत केलेल्या टिकेविषयी त्यांना विचारले. त्यावर ते म्हणाले, त्यांनी माझी मानसिकता तपासावी, मी त्यांचे डोकं तपासतो. त्यांची स्मृती कमी आहे. काँग्रेसने एक कायदा तीनदा आणला व तीनही वेळेस तो कायदा रद्द करावा लागला, अशी आठवण करून दिली.

Chandrakant Patil & Sanjay Raut
राष्ट्रवादीचा काँग्रेस-शिवसेनेला एकाच वेळी दे धक्का!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा झाल्यानंतर देश उत्सव साजरा करत असताना कोणाला शोक वाटतं असेल, तर मानसिकता तपासावी लागेल. अशी टीका खासदार राऊत यांनी श्री. पाटील यांच्यावर केली.

खासदार राऊत यांच्या टिकेवर श्री. पाटील यांनी पलटवार केला. परिवहनमंत्री अनिल परब, देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी विधान परिषदेची जागा बिनविरोध करण्यासाठी आले होते. त्या वेळी परब यांना संप कसा मिटविता येईल, हे कागद-पेन घेऊन समजावून सांगावे लागल्याची टीका पाटील यांनी केली.

...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in