चंद्रकांत दादा, बोलताना भान ठेवूनच बोललं पाहिजे!

सतत शब्द फिरवणाऱ्या चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्ते काय आदर्श घेणार?
चंद्रकांत दादा, बोलताना भान ठेवूनच बोललं पाहिजे!
Ekanth Khadse & Chandrakant PatilSarkarnama

नंदुरबार : निवडणूक हरलो तर हिमालयात जाईन असे विधान करणारे भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आता हिमालयात जातील का ? असा प्रश्‍न करीत त्यांनी हिमालयात जाण्याच्या शब्द फिरवल्याने कार्यकर्ते त्यांच्यापासून काय आदर्श घेतील, असा प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला.

Ekanth Khadse & Chandrakant Patil
कोर्ट `विक्रांत` सारख्या प्रश्नावर दिलासा देत असेल तर जनतेचा उद्रेक होईल!

श्री खडसे यांनी भाजपच्या वक्तव्यांविषयी टिका केली. त्यांच्या विधानांवर प्रश्न उपस्थित करून बोलताना भान ठेवूनच बोललं पाहिजे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिला.

Ekanth Khadse & Chandrakant Patil
चाचडगाव, वाचनसंस्कृती आणि वाचनालय...

नंदुरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते खडसे यांनी भेट दिली, त्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजपच्या दिग्गज नेत्यांनी प्रचारात उडी घेतली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतत दोन तास जाहीर सभातून बोलत होते. प्रचारसभेत फडणवीस व चंद्रकांत पाटलांनी मतदारांवर घोषणांच्या पाऊस पाडला. भीष्मप्रतिज्ञा दिल्या तरीही मतदारांनी त्यांना साफ नाकारलं.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या हिमालय जाण्याच्या मुद्द्यावरून ते म्हणाले, निवडणूक हरल्यास हिमालयात जाऊ, असे चंद्रकांत पाटलांनी सांगितले होते. परंतु, ते आता दिलेल्या शब्दांपासून पळवाटा शोधत असल्याने त्यांच्यापासून त्यांचे भाजप कार्यकर्ते काय आदर्श घेतील, असा खोचक प्रश्‍न उपस्थित करीत बोलतांना भान ठेवण्याच्या सल्लाही त्यांनी दिला.

शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, श्री. चौधरी यांनी श्री. खडसे यांचा सत्कार केला. माजी आमदार उदेसिंग पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल प्रदेश समन्वयक डॉ. तुषार संनसे, तळोदा पालिकेचे बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, तळोदा राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश मराठे, केसरसिंग क्षत्रिय, राष्ट्रवादी युवकचे संदीप परदेसी,नजोमुद्दिन खाटीक, आदिल शेख, हितेश चौधरी, डॉ. काशिनाथ चौधरी उपस्थित होते.

मशिदींसमोर भोंग्याने समाजात तेढ

हनुमान चालिसा वाजवण्यासाठी कोणतेही कायदे नाहीत. हनुमान चालीसाचे पठण हे केलेच पाहिजे, तो हिंदू धर्माचा एक भाग आहे. मंदिरांमध्ये हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मर्यादा नाहीत. परंतु, एखाद्या मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावत असाल, तर त्याठिकाणी तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. दोन समाजात तेढ निर्माण होऊन त्याच्या पुढील कालावधीत समाजाला दुष्परिणाम भोगावे लागणार नाहीत, याचा विचार करणे गरजेचे आहे श्री. खडसे म्हणाले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.