चंद्रकांतदादा तुम्हीही मसणात जाणारच आहात ना!

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा, युवकांची टाळकी फिरतील अशी वक्तव्ये करू नका.
Chandrakant Patil News, NCP latest Marathi News
Chandrakant Patil News, NCP latest Marathi NewsSarkarnama

नाशिक : भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निषेध केला आहे. `सगळेच मसणात जाणार आहेत. चंद्रकांतदादा तुम्हालाही एक दिवस मसणात जावे लागेल` अशी टिका त्यांनी केली. (NCP Youth protest BJP leader Chandrakant Patil On Sule statement)

Chandrakant Patil News, NCP latest Marathi News
राष्ट्रवादीचा बसपला धक्का; नगरसेविकेसह माजी नगरसेवक पतीचा पक्षप्रवेश

यासंदर्भात जिल्हाध्यक्ष पुरषोत्तम कडलग यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, मसणात एकदिवस तुम्हीही जाणार आहात आणि सगळेच जाणार आहेत. चांगले वागून, आदर देवून आणि सभ्यपणे बोलून लोकांच्या मनात जागा मिळवता येत असेल तर बघा. नाहीतर मतदारसंघ शोधत फिरत राहणे नशिबी येईल! (Chandrakant Patil News)

Chandrakant Patil News, NCP latest Marathi News
शिवसेनेचे दोन 'संजय' राज्यसभेत जाण्यासाठी सज्ज; 'मविआ'चे एकीचे दर्शन अन् शक्तीप्रदर्शन

ते पुढे म्हणाले, असभ्य संस्कृतीच्या वक्तव्याची सुरूवात तुमच्या पक्षाच्या लोकांनीच सुरू केली होती. त्यांना आपण मानधन देता. परंतू प्रदेशाध्यक्ष पदावरून मसणाची भाषा वापरता? हे योग्य आहे का?.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला, त्या दिवशी तुमच्या आशिर्वादाने प्रेरीत झालेल्या गोरगरीब एसटी आंदोलन कर्त्यांना भडकावून मॉब सायकॅालॅाजी तयार करून कार्यक्रम केलात. या ५०० चवताळलेल्या लोकांना तोंड द्यायला ही सुप्रिया सुळे ही वाघीन एकटी सामोरी गेली. तेव्हा तुम्ही दुरचित्रवाहिनीवर मजा बघत होतात. माथेफिरू हल्लेखोरांना विनंती करत होती की, असं करू नका. मी तुमच्या भावनांचा आदर करते आणि तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे. हे असतात संस्कार .

श्री. कडलग यांनी आमदार पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून "कशासाठी राजकारण करता? घरी जा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या!" अशी बेताल वक्तव्ये केली. कधी ना कधी आपल्या संस्कृतीचे दर्शन आपल्या वागण्यतून होतेच. तशी ती झाली.

तुम्ही काहीही आव आणत असला तरी, आपण २०१९ मध्ये जनतेतून आमदार झालात. ते देखील लाटेत आणि कसे झालात ते महाराष्ट्राला माहीत आहे. त्याआधी तुम्ही बरीच वर्षे विधान परिषदेवर होतात. सुप्रियाताई २००९ मध्ये लोकसभेत गेल्या होत्या, त्या आधीही त्या राज्यसभेत होत्या. थोडक्यात, तुमच्यापेक्षा वयाने १० वर्ष लहान असूनही सुप्रियाताई तुम्हाला थेट जनतेतून निवडून येण्याच्या राजकारणात १० वर्ष सिनियर आहेत, हे विसरू नका.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com