पीकविमा कंपन्यांना किती नफा पाहिजे हे केंद्राने ठरवावे!

कृषीमंत्री दादा भुसे यांनी खरीप आढावा बैठकीत पीकविमा कंपन्याच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली.
पीकविमा कंपन्यांना किती नफा पाहिजे हे केंद्राने ठरवावे!
Dada Bhuse In Agriculture MeetingSarkarnama

नाशिक : पीकविमा (Crop Insurance) कंपन्यांच्या नफ्यावरील मर्यादाविषयक निर्णय केंद्र सरकारकडून (Centre) अपेक्षित आहे. या कंपन्यांना दहा टक्के नफ्याची (10 percent profit)आणि दहा टक्के नुकसानीची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे, असे राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी येथे स्पष्ट केले.

Dada Bhuse In Agriculture Meeting
संजय राऊत मंगळवारी मोठा बॉम्बस्फोट करणार!

शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात पुरेसा पाऊस झाल्यावर पेरणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील खरीप हंगाम तयारी आढावा बैठकीनंतर श्री. भुसे पत्रकारांशी बोलत होते. कृषीचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.

Dada Bhuse In Agriculture Meeting
विरोधकांकडून आरक्षण संपविण्याचा प्रयत्न!

ते म्हणाले, राज्यातील १६० लाख हेक्टरपैकी २७ लाख ४५ हजार हेक्टर खरिपाचे नाशिक विभागातील क्षेत्र आहे, असे सांगून श्री. भुसे म्हणाले, की सोयाबीन आणि कापूस ही राज्यातील मोठी पिके आहे. नाशिक विभागात कापूस, सोयाबीन, मका, ऊस आणि फळपिके ही मोठी पिके आहेत. यंदाच्या खरिपामध्ये बियाणे, खतांसह कृषी निविष्ठांची कमतरता भासणार नाही. केंद्राकडे राज्यासाठी ५२ लाख टन खताची मागणी केली होती. केंद्राने ४५ लाख टन खते मंजूर केली आहेत. तसेच जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या शेतकरी कुटुंबांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत देण्यात येणाऱ्या दहा वाणाच्या बियाण्यांच्या कीटसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद केली जाईल.

याशिवाय जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून राबवण्यात येणाऱ्या पोकरा योजनेचा दुसऱ्या टप्प्यात राज्यभर राबवण्यासाठी पडताळणी करण्यात येत आहे. यंदा कांद्याची उत्पादकता कमी झाली आहे, ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा, टोमॅटोच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी कृषी विद्यापीठांना सांगण्यात आले आहे.

मॉन्सून पूर्व पावसाकडे असू द्या लक्ष

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, कृषी आयुक्त धीरजकुमार, कृषी संचालक विकास पाटील, दिलीप झेंडे, कैलास मोते, सुभाष नागरे, दशरथ तांभाडे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी.(नाशिक), डॉ. राजेंद्र भोसले (नगर), जलज शर्मा (धुळे), अभिजित राऊत (जळगाव), मनीषा खत्री (नंदुरबार), मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (नाशिक), आशिष ऐरेकर (नगर), भुवनेश्वरी एस. (धुळे), डॉ.पंकज आशिया (जळगाव), रघुनाथ गावडे (नंदूरबार), कृषी विभागाचे सहसंचालक विवेक सोनवणे आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.