Raosaheb Danve: पाचोरा-बोदवड ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्प मार्गी लावणार

केंद्र शासनाने ९९५ कोटीच्या खर्चाला केंद्राची मंजुरी दिल्याची रेल्वे राज्यमंत्री दानवे यांची माहिती.
Raosaheb Danve with BJP leaders
Raosaheb Danve with BJP leadersSarkarnama

जामनेर : गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या पाचोरा-जामनेर (पीजे) रेल्वेचे (Pachora Railway) रूपांतर आता नॅरोगेज न रहाता ब्रॉडगेज (Broadguage) होईल. ही रेल्वे पुढे बोदवडपर्यंत ईलेक्ट्रीक लाईनसह वाढविण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री (Minister of State) रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी येथे केली. या कामासाठी तब्बल ९५५ कोटी रूपयांच्या पहिल्या टप्प्याच्या खर्चाला केंद्राने तत्काळ मंजुरी दिल्याची माहितीही श्री. दानवे यांनी दिली. (Raosaheb Danve announce Pachora-Bodwad PJ Railway project)

Raosaheb Danve with BJP leaders
Eknath Khadse: ...एकनाथ खडसे अमित शहा यांना का भेटले असावे?

शहरातील बाबाजी राघो मंगल कार्यालयात भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित कार्यकर्ता मेळावा आणि पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

Raosaheb Danve with BJP leaders
Shivsena: आगामी काळ फक्त ठाकरेंचा...इतरांची धुळधाण!

श्री. दानवे यांनी सांगितले, की २०१४ च्या नंतर आलेल्या केंद्रातील नरेंद्र मोदींच्या सरकारने शेवटचा माणूस केंद्रबिंदू मानुन अनेक लोकाभिमुख योजनांची अंमलबजावणी सुरु केली. काँग्रेसचे आज ५५ खासदार असतानाही त्यांच्याकडे उभारी देणारा नेताच शिल्लक नसल्याचा टोलाही श्री. दानवे यांनी लगावला.

रेल्वेबाबत आणखी काही घोषणा करीत त्यांनी सांगितले, की जालना ते जळगाव मार्गाचा ‘डीपीआर’ सादर करण्यात आला. पीजेसाठी बोदवडपर्यंत ८४ किलोमीटरची सर्व सुविधायुक्त अद्ययावत ब्रॉडगेजसाठी ९५५ कोटीच्या खर्चाची घोषणा करून येत्या दीड ते दोन वर्षात हे काम पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. लवकरच ४०० वंदेमातरम रेल्वे सुरू होणार असल्याचेही मंत्री दानवे यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावला सर्व पॅथीची सुविधा असणारे अद्ययावत हॉस्पिटल उभारण्यात येऊन येथे मेडीकल हब लवकरच तयार होणार असल्याचे सांगितले. शहरातील क्रीडा संकुलासाठी सुमारे २० कोटीचा खर्च येणार आहे, लवकरच या कामालाही सुरुवात होईल असे सांगून सर्वांनी स्वच्छता ठेवून आपापली गावे १०० टक्के हगणदारीमुक्त करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पंढरपूरपर्यंत रेल्वेची सेवा देऊन आवश्यक असणाऱ्या स्थानकांवर थांबे देण्याची मागणी खासदार रक्षा खडसे यांनी केली. खासदार उन्मेश पाटील यांनीही मंत्र्यांकडे विविध मागण्या केल्या. नवलसिंग राजपूत यांनी सूत्रसंचलन तर रवींद्र झाल्टे यांनी आभार मानले.

या वेळी राज्याचे ग्रामविकास तथा क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, नगराध्यक्षा साधना महाजन, आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे, आमदार चंदुलाल पटेल, आमदार मंगेश चव्हाण, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जितू पाटील, प्रा. शरद पाटील, छगनराव झाल्टे, प्रयाग कोळी, दिलीप खोडपे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com