राज्यमंत्री भारती पवार आणि खासदार हेमंत गोडसे विकासासाठी एकत्र!

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि खासदार हेमंत गोडसे वेलनेस सेंटरच्या कार्यक्रमात एकत्र आले.
Centre Minister Bharti Pawar & Hemant Godse

Centre Minister Bharti Pawar & Hemant Godse

Sarkarnama

नाशिक : भारतीय जनता पक्ष (BJP) आणि शिवसेना (Shivsena) या पक्षात सध्या टोकाचा संघर्ष दिसतो. कोकणात केंद्रातील मंत्री रोज शिवसेना व राज्य सरकारवर (Mahavikas Aghadi) टिका करताना दिसतात. नाशिकला मात्र विकासाच्या प्रश्नावर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे एकत्र आल्याचे दिलासादायक चित्र आहे.

<div class="paragraphs"><p>Centre Minister Bharti Pawar &amp; Hemant Godse</p></div>
महापौर उद्धव ठाकरेंचे नाही, किमान प्रविण दरेकरांचे तरी ऐकतील का?

केंद्रीय अधिकारी, कर्मचारी तसेच पेंशनधारकासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्यातून साकारलेल्या प्रेस कॉलनी गांधीनगर येथील वेलनेस सेंटरचे सोमवारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी राज्यमंत्री पवार यांनी या उपक्रमाचे स्वागत करीत अन्यत्र देखील असे उपक्रम सुरु केले जातील असे सांगितले.

डॉ. पवार म्हणाल्या, नाशिक येथे वेलनेस सेंटर व्हावे ही काळाची गरज होती. येथे वेलनेस सेंटरच्या एका क्लिनिकचे उद्‌घाटन झाले असून, लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेता लवकरच इतरत्र वेलनेस सेंटरच्या शाखा सुरू करण्यात येणार आहे. वेलनेस सेंटरसाठी खासदार गोडसे यांनी पाठपुरावा केला. मंत्रिपदी विराजमान होताच डॉ. पवार यांनी त्यांनी वेलनेस सेंटरच्या मान्यतेला गती दिल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>Centre Minister Bharti Pawar &amp; Hemant Godse</p></div>
एका पत्राने वाचवले महापालिकेचे १७४ कोटी रुपये?

केंद्रीय अधिकारी, कर्मचारी, तसेच पेंशनधारकांसाठी वेलनेस सेंटर एक वरदान ठरणार आहे. वेलनेस सेंटरमुळे केंद्रीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना यापुढे मुंबई, पुणे येथे उपचारासाठी जाण्याची गरज पडणार नाही. परिणामी रुग्णांची कुचंबणा थांबणार असून आर्थिक नुकसान टळणार आहे. वेलनेस सेंटर नाशिक येथे होण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले असून केंद्रीय अधिकारी, कर्मचारी आणि पेंशनधारकांनी वेलनेस सेंटरचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन खा. हेमंत गोडसे यांनी केले आहे.

एम्सची शाखा उघडावी

जिल्हयात सव्वीस हजार केंद्राचे कार्ड होल्डर असून, त्यांच्या कुटुंबीयांची संख्या लाखाच्या घरात आहे. वेलनेस सेंटरमुळे सर्वांनाच आरोग्याविषयक सोयीसुविधा मिळणार आहे. अधिकाधिक कर्मचारी आणि अडीच हजार कार्ड होल्डरसाठी वेलनेस सेंटर या न्यायाने पंचवीस हजार कार्ड होल्डरसाठी शहर आणि परिसरात दहा वेलनेस सेंटरच्या शाखांची निर्मिती करावी. आयुष आणि होमियोपॅथी निगडीतच्या सुविधा वेलनेस सेंटरमध्ये उपलब्ध व्हाव्यात, एम्सची शाखा नाशिक येथे उघडण्यात यावी, अशा जिल्हावासीयांसाठीच्या महत्त्वाच्या मागण्या या वेळी खासदार हेमंत गोडसे यांनी डॉ. भारती पवार यांच्याकडे केल्या.

यावेळी खासदार हेमंत गोडसे, महापौर सतीश कुलकर्णी, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज आहिरे, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, दिनकर पाटील, राहुल दिवे, नगरसेविका सुषमा पगारे, आशा तडवी, लक्ष्मण सावजी, अनिल ताजनपुरे, सीजीएचएसचे निखिलेश चंद्रा, अलका आहुजा, श्रीमती देसाई आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com