केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार कोरोना पॅाझिटीव्ह!

आज सकाळी कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाला
Dr Bharati Pawar

Dr Bharati Pawar

Sarkarnama

नाशिक : केंद्रीय (centre Government) आरोग्य राज्यमंत्री डॅा भारती पवार (Dr Bharti Pawar) कोरोना (Covid) बाधीत झाल्या आहे. गेले काही दिवस त्या सातत्याने विविध शासकीय व सार्वजनिक कार्यक्रमांत व्यस्त होत्या. त्यांना काल अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली होती.

<div class="paragraphs"><p>Dr Bharati Pawar</p></div>
तहसीलदारांच्या आपुलकीने `त्या` ज्येष्ठाने आत्महत्येचा विचार सोडला!

याबाबत सुत्रांनी सांगितले की, डॅा भारती पवार यांना काल अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांनी खबरदारीचा पर्याय म्हणून त्यांनी वैद्यकीय कक्षाशी संपर्क करून कोरोना चाचणी केली होती. आज सकाळी चाचणीचा अहवाल प्राप्त झाला. त्यात त्यांचा अहवाल पॅाझिटीव्ह आला. त्यामुळे त्या क्वारंटाईन झाल्या. त्यांचे शासकीय व अन्य कार्यक्रम तुर्त स्थगित करण्यात आले आहेत.

<div class="paragraphs"><p>Dr Bharati Pawar</p></div>
धुळ्याची शिवसेना प्रतिमा अन् अंतर्गत वादात रूतली!

डॅा पवार गेले काही दिवस सातत्याने व्यस्त होत्या. संसदेचे हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांत कार्यक्रमांना हजेरी लावली होती. विशेषतः कोविड विषयक आढावा घेण्याचे काम त्या सातत्याने करीत होत्या. या दरम्यान सार्वजनिक कार्यक्रम झाले. त्यानंतर काल अस्वस्थ वाटल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. आता त्यांनी क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही खासदार कोरोनाग्रस्त

दरम्यान चार दिवसांपूर्वी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे कोरोनाग्रस्त झाले होते. आता डॅा भारती पवार कोरोनाग्रस्त झाल्याने नाशिकचे दोन्ही खासदार कोरोनाग्रस्त झाले आहेत. भारतीय जनता पक्षाचे शहरातील आमदार अॅड राहुल ढिकले यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे सध्या शहरातील लोकप्रतिनिधी सावध झाले आहेत.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com