केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी गोंदीयाचा दौरा सोडून रात्रीच थेट नगरचे रुग्णालय गाठले!

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा. भारती पवार यांनी नगर सिव्हील हॅास्पिटलला भेट दिली.
M.P. Sujay Vikhe Patil & Dr Bharti Pawar
M.P. Sujay Vikhe Patil & Dr Bharti PawarSarkarnama

नाशिक : दुर्घटना घडल्यावरच धावाधाव का करता?. यामध्ये रुग्णांना किंमत मोजावी लागते. केंद्र शासन याबाबत सातत्याने अलर्ट करीत असते. तेव्हा वैद्यकीय प्रशासन जागरूक का नसते? असा प्रश्न केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा. भारती पवार (Centre Health minister of State Dr. Bharti Pawar) यांनी नगर सिव्हील हॅास्पिटलच्या प्रशासनाला केला.

M.P. Sujay Vikhe Patil & Dr Bharti Pawar
गिरीश महाजनांनी अद्वय हिरेंकडे नेतृत्व सोपवून `राष्ट्रवादी`ला साईड ट्रॅक केले

नगर सिव्हील हॅास्पिटलच्या आयसीयू कक्षाला रविवारी आग लागली. या दुर्घटनेत अकरा रुग्णांना प्राण गमवावे लागले. या दुर्दैवी घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. या घटनेची माहिती मिळाल्यावर गोंदीया, भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यांनी तातडीने तो दौरा आटोपता घेत थेट नगरला प्रयाण केले. त्या नगर सिव्हील हॅास्पिटलला पोहोचल्या तेव्हा रात्र झाली होती. त्यांनी आगग्रस्त अती दक्षता विभागाला भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेची माहिती घेतली. रुग्णांच्या नातेवाईकांशी त्या बोलल्या. ही सर्व माहिती घेतल्यावर त्यांनी रुग्णालयातूनच रात्रीच त्यांनी आपल्या विभागाच्या केंद्रीय वैद्यकीय सचिवांशी संपर्क केला.

M.P. Sujay Vikhe Patil & Dr Bharti Pawar
छगन भुजबळांनी उचलला साहित्य संमेलन सर्वात्कृष्ट करण्याचा विडा!

यासंदर्भात त्या `सरकारनामा`शी बोलल्या. त्या म्हणाल्या, ही दुर्घटना अतिशय खेदजनक आहे. या वॅार्डमध्ये गंभीर तसेच कोव्हीडचे रुग्ण देखील होते. त्यांना अगदी बेडसह हलवावे लागले. त्यामुळे काहींचे प्राण वाचले. प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यावर मी तातडीने संबंधीतांशी भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी तुम्ही काय करणार? विचारणा केली. आपल्याकडे दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन धावपळ करते. वस्तुतः केंद्रीय सचिवांशी झालेल्या चर्चेत त्यांनी यासंदर्भात सातत्याने परिपत्रक तसेच दक्षतेसाठी अलर्ट दिला जातो. त्यामुळे प्रशासनाने याबाबत जागरूक रहायला पाहिजे. आता या प्रकरणाची विभागीय महूल आयुक्तांशी चर्चा झाली आहे. त्यांच्याकडून या घटनेची चौकशी केली जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यावर पुढील कार्यवाही होईल.

महाराष्ट्रात अलिकडे नाशिक, मुंबई, चंद्रपुर तसेच अन्यत्र काही रुग्णालयात दुर्घटना घडल्या आहेत. देशात अन्यत्र देखील या घटना घडल्या आहेत. हा अतिशय संवेदनशील विषय आहे. त्याबाबत संबंधीतांशी चर्चा करेन, असे डॅा. भारती पवार यांनी सांगितले. यावेळी खासदार सुजय विखे-पाटील त्यांच्या समवेत होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com