NCP News: केंद्र सरकार ब्लॅकमेल करून सत्ता हस्तगत करण्यात व्यस्त

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नाशिक शहरात महागाई विरोधांत आंदोलन.
NCP agitation in Nashik
NCP agitation in NashikSarkarnama

नाशिक : वाढत्या महागाई (Inflation) विरोधात युवक राष्ट्रवादीच्या (NCP) वतीने राष्ट्रवादी भवन येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी “५० खोके महागाई एकदम ओके !”, “जनता भरते जीएसटी, गद्दार जातात गोहाटी..!”, “महागाई कशासाठी, आमदारांच्या खरेदीसाठी..!” , “महागाईने दुखते डोके, गद्दारांना ५० खोके... ५० खोके..!” “ बहुत हो गयी महंगाई की मार, चलो हटाये मोदी सरकार..!” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. (NCP youth wing agitation aganst state & Centre Government)

NCP agitation in Nashik
MVP Election: प्रविण जाधव यांच्या समर्थकांनी महिलांना घराबाहेर ओढून मारहाण!

प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शहराध्यक्ष अंबादास खैरे, प्रदेश पदाधिकारी शादाब सय्यद यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष खैरे म्हणाले, देशातील वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार सर्वसमान्य जनतेवर आर्थिक भार देऊन रुग्णालय सेवा, शिक्षण यासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावत आहे. तसेच मध्यवर्ती बँकेकडून सुद्धा व्याजदर वाढविले जात आहे. यामुळे जनता मेटाकुटीला आली असून सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील बनले आहे.

NCP agitation in Nashik
शहाजीबापू, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा अन्‌ मतदारसंघात लक्ष द्या : शिवसेनेकडून प्रत्युत्तर

केंद्र व राज्य सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्यावर विविध केंद्रीय संस्थांमार्फत अडकविले जात आहे. त्यामुळे देशात हुकुमशाही होत असल्याचा आरोप करत युवक राष्ट्रवादीने महागाई विरोधात आंदोलन केले.

दोन महिन्यापासुन सरकार अस्तित्वात आले परंतु फोटोसेशन व्यतीरीक्त कुठलाही ठोस निर्णय मोदी सरकार व राज्य सरकार घेवु शकले नाही व महागाई,बेरोजगारी तसेच पावसामुळे पिंकाचे झालेले नुकसान हे विषय देशांतील सर्वसामान्य जनतेसाठी महत्वाचे असुन त्याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेताना सरकार दिसत नाही. फक्त व्यक्तीद्वेशाचे राजकारण करत व जिथे सत्ता नसेल तिथे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत ब्लेकमेल करून सत्ता हस्तगत करणे या कामात व्यस्त असताना केंद्रांचे नेते दिसतात मग त्यात महाराष्ट्रात सत्ता हस्तगत करताना ५० खोक्याची चर्चा आज राज्य आणि देशभरात चालु आहे.

यावेळी जय कोतवाल, गोटू आहेर, सागर बेदरकर, दत्ता वाघचौरे, विशाल डोखे, दिनेश धात्रक, राहुल कमानकर, गौरव ढोकणे, संतोष जगताप, कपिल भावले,डॉ.संदीप चव्हाण, अभिषेक शेवाळे, जाणू नवले, अक्षय भोसले, विक्रांत डहाळे, हर्षल चव्हाण, सुनिल घुगे, अक्षय पाटील, रामेश्वर साबळे, अक्षय पाळदे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

...

अमेरिका, चीन हे विकसित देश असून भारत हा विकसनशील देश आहे. त्यामुळे भारतात महागाई निश्चित जास्त राहणार हे केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांना एसी रूम मधून काय कळणार, महागाई आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरली असून केंद्र सरकार जीएसटीच्या माध्यमातून सर्वसामान्यांची पिळवणूक करत आहे.

– अंबादास खैरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com