शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच कैद्याला सोडणारे पोलिस झाले कैद!

नाशिक रोड कारागृहातील दोन अधिकारी, एका लिपिकावर गुन्हा दाखल.
शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच कैद्याला सोडणारे पोलिस झाले कैद!
Cantral jail file photoSarkarnama

नाशिक रोड : येथील कारागृहात (Central Jail) कर्मचाऱ्यांनी कैद्यास शिक्षेचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच आपल्या फायद्यासाठी कारागृहातून सोडून दिले. याबाबत नोंदवहीत खाडाखोड केल्याचे लक्षात आल्याने कारागृहातील दोन अधिकाऱ्यांसह वरिष्ठ लिपिकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल झाला असुन आता कैद्याला सोडणारेच कैदी (Prisoner) होणार आहेत.

Cantral jail file photo
अशोक चव्हाण, सतेज पाटलांना जे जमलं, ते राष्ट्रवादीला पंढरपुरात का जमलं नाही?

तुरुंग अधिकारी श्यामराव गिते, तुरुंग अधिकारी माधव खैरगे व वरिष्ठ लिपिक सुरेश डबेराव नाशिक रोड कारागृहात कार्यरत आहेत. त्यांनी २०१७ मध्ये कारागृहात शिक्षाबंदी असलेल्या तीन कैद्यांना त्यांच्या शिक्षेचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच आपल्या फायद्यासाठी कारागृहातून बेकायदेशीर सोडून शासनाची फसवणूक केली.

Cantral jail file photo
'फडणवीस पळपुटे, तर राज ठाकरेंचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही काय?'

ही बाब कारागृह प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर कारागृह महासंचालकांनी अंतर्गत चौकशीचे आदेश दिले होते. त्यात दोषी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या आदेशाने तुरुंगाधिकारी सतीश गायकवाड यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात तुरुंग अधिकारी श्यामराव गिते, तसेच नांदेड जिल्हा कारागृहातील तुरुंगाधिकारी माधव खैरगे व जालना जिल्हा कारागृहात कार्यरत वरिष्ठ लिपिक सुरेश डबेराव यांच्या विरोधात फिर्याद दिली. अधिक तपास वरिष्ठ पोलिस करीत आहे.

स्वातंत्र्याच्या ऐतिहासिक पाऊलखुणा असणारे हे जेल नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी गाजत असते. त्यामुळे घटना बाहेर पडल्यावर कारागृह वर्तुळात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे. याच संदर्भात अन्य अधिकाऱ्यांच्या बाबतीत काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मागील रेकॉर्ड तपासणार

राजलिंगम गुंटुका याला १४ दिवसांची संचित रजा मंजूर असताना ४०९ दिवस फरारी होता. पोलिसांनी हजर केले, मात्र नोंदवहीमध्ये केवळ ४४ दिवस उशिराने आल्याचे दाखविण्यात आले. व्यंकट रामलू वेंकटय्या या कैद्याला रजेवर सोडण्यात आले. मात्र हा नियत कालावधीत हजर न होता तीन हजार ४३५ दिवस उशिराने हजर झाला. मात्र नोंदवहीमध्ये खाडाखोड करून दोन हजार ७०६ दिवस दाखविण्यात आले. विलास बाबू शिर्के या कैद्याला माफीच्या दिवसांची नोंद एक हजार ४०७ असताना खाडाखोड करून दोन हजार १२७ दिवसांची करून कारागृहातून मुक्त करण्यात आले. हे प्रकरण समोर आल्यानंतर आता गेल्या काही दिवसांचे रेकॉर्ड तपासले जाणार आहे. यामध्ये आणखी काय माहिती मिळते, हे लवकरच समोर येईल.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.