भुजबळांच्या नावे फोन, ‘तुम्ही माझे काम करून द्या, मी तुमचे करून देतो’

भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील अपहाराच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले सुनील झंवर यांच्या मुलास नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ व त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या नावाने फोन केला.
Bogus call in Bhujbal Name
Bogus call in Bhujbal NameSarkarnama

नाशिक : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) (BHR Society scam) पतसंस्थेतील अपहाराच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले सुनील झंवर (BHR Accuse Sunil Zanvar) यांच्या मुलास नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ व (Guardian Minister Chhagan Bhujbal) त्यांचे पुत्र पंकज भुजबळ (Ex MLA Pankaj Bhujbal) यांच्या नावाने फोन करत ‘तुम्ही माझे एक काम करून द्या, मी तुमचे काम करून देतो,’ असे सांगत फसवणूक (Fraud call) केली. या प्रकरणात चक्क जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांचेही नाव वापरले गेले. अखेर या प्रकरणाची चौकशी करून अंबड पोलिसांत (FIR in Ambad Police station) महाराष्ट्र शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bogus call in Bhujbal Name
छगन भुजबळांवर ताणलेली बंदूक कोणाची? शिवसेनेची की राष्ट्रवादीची?

बीएचआर पतसंस्थेच्या प्रकरणात सुनील झंवर यांच्यावर पुण्याच्या डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात झंवर यांना ७ सप्टेंबरला अटक करण्यात आली आहे. त्यांचा मुलगा सूरज झंवर उच्च न्यायालयात कामानिमित्त आले असता, त्यांना ९४२३४२११११ या क्रमांकावरून फोन आला. मी पंकज भुजबळ बोलत असून, तुम्ही ८ सप्टेंबरला मला जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन भेटा, असे सांगत फोन बंद केला गेला. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरून फोन करून पंकज भुजबळांचा पीए बोलत असल्याचे सांगत, अजून तुम्ही जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात पोचले नाहीत. कलेक्टर साहेबांचा पीए वाट पाहत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर काही वेळात जळगाव येथील एका लँडलाइन क्रमांकावरून फोन करत ‘मी अभिजित राऊत (जळगाव जिल्हाधिकारी) बोलतोय... तुमचे काही काम आहे का’ अशी विचारणा केली गेली. मात्र, सूरज झंवर यांनी नाही म्हटल्यावर समोरच्या व्यक्तीने फोन ठेवला. त्यानंतर, झंवर यांनी जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. त्यांनाही या प्रकारासंदर्भात काहीच माहिती नव्हती. त्याच वेळी जळगाव जिल्हाधिकारी यांच्या लँडलाइनवर नाशिकहून पंकज भुजबळ यांचा फोन आल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांच्या पीएने सांगितले. त्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा मोबाईलद्वारे पंकज भुजबळ बोलत असल्याचा फोन आला व लँडलाइनवरून फोन करण्यास सांगण्यात आले.

Bogus call in Bhujbal Name
छगन भुजबळ, सुहास कांदे हा तर किरकोळ वाद

कोणाला सांगू नका...

सूरज झंवर यांनी जळगाव येथील मित्राच्या लँडलाइनवरून फोन लावला असता, स्वतः छगन भुजबळ असल्याची बतावणी करत, माझा फोन आल्याचे कोणाला सांगणार नाही, असे वचन देण्याचे सांगून तुम्ही माझे एक काम करून द्या, मी तुमचे एक काम करून देतो, अशी ऑफर दिली गेली. तुम्हाला समीर व पंकज भुजबळही मदत करतील आणि संपर्कात राहतील, असे सांगत फोन बंद केला गेला.

चौकशी करून गुन्हा दाखल

मोबाईलवर आलेल्या ऑडिओ क्लिप नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ यांना ऐकविण्यात आल्या. त्यावरून ‘तो’ आवाज त्यांचा नसल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी नाशिक पोलिसांत १८ सप्टेंबरला तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांनी या प्रकरणाची चौकशी करत पालकमंत्री भुजबळ, जळगावचे जिल्हाधिकारी राऊत, पंकज भुजबळ यांच्या नावाचा वापर करत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com