तेजोमय दीपावलीत उज्ज्वल भविष्याची बीजे..!

खानदेशातील बाजारपेठांतील सकारात्मक वातावरण असेच कायम राहिले पाहिजे.
Shopkeeper In market
Shopkeeper In marketSarkarnama

डॉ. राहुल रनाळकर

नाशिक : कोरोनानंतरच्या (After Covid19 period) दोन वर्षांच्या मुक्त वातावरणातील दीपावलीने (Diwali festiwal) न भूतो असे उद्योग, व्यवसायाचे (Business) भवितव्य रेखाटल्याने आशेचा नवा किरण उदयाला आला आहे. जवळपास ५०० कोटींच्या वर नाशिकच्या (Nashik Market) बाजारपेठेत उलाढाल झाल्याने सकारात्मक वातावरण तयार झाले. हीच काहीशी स्थिती खानदेशातील सर्व जिल्ह्यात बाजारपेठांची होती. हे सकारात्मक वातावरण असेच कायम राहिले पाहिजे. (This festival`s positive business turnover and situation shall maintain)

Shopkeeper In market
अस्वस्थ गुलाबराव म्हणाले, `या रवी राणांना कोणी तरी आवर घाला`

मागील आठवडा हा दिवाळीच्या धामधुमीचा काळ. या काळात नाशिककरांच्या आणि खानदेशातील जनतेच्या उत्साहाला उधाण आले होते. दिवाळी संपून आता व्यवहार पूर्ववत होत असताना दिवाळीच्या दिवसांकडे नजर टाकणे महत्त्वाचे वाटते.

Shopkeeper In market
शेतकर्‍यांना घेऊन प्राजक्त तनपुरेंनी गाठले पोलीस ठाणे

यंदाच्या दीपावलीमध्ये भविष्याच्या वातावरणाचे बीज निश्चितपणे रोवले गेले आहे. गेली दोन वर्षे सर्वजण कोरोनाच्या महामारीला सामोरे गेले. या कालावधीत सर्वच कुटुंबांचा दोन वर्षे आरोग्याशी संघर्ष पाहायला मिळाला. आरोग्याशी संघर्ष करताना लॉकडाउनचा पर्याय शासनाला दिसला. प्रत्येकाने काही काळ का होईना स्वतःला घराच्या आत कोंडून घेतले. या कोंडमाऱ्याने अनेकांमधील माणुसकीची जाणीव जागृत झाली.

‘जान है तो जहाँन है’ हे प्रत्येकाला जणू पटले-समजले. दोन वर्षांत जगात अनेक उलथापालथी झाल्या. या अनुभवातून प्रत्येकाला जगण्याची नवी उमेद मिळाली. नव्या जगण्याचा परिणाम हा यंदाच्या दिवाळीत बाजारपेठेतील उत्साहातून ठळकपणे दिसून आला. या दिवाळीत प्रत्येकाने थोडा का होईना, जरा जास्तच खर्च केला. कपडे, नवीन वस्तू, स्थावर मालमत्ता अशा कुठल्याही प्रकारच्या खरेदीत हात आखडता न घेता नाशिककर बाजारात खरेदीसाठी अक्षरशः तुटून पडले. या कृतीतून भविष्यातील बाजारपेठ नवे संकेत देत आहे. ही वाटचाल अधिक उन्नतीसाठी पोषक ठरणारी आहे.

बाजारपेठेत न भूतो अशी खरेदी झाली. केवळ नाशिकच्या बाजारपेठेत ५०० कोटींवर झालेल्या खरेदीमुळे बाजारात चैतन्य उसळले. मागील दोन वर्षांची ही कसर ग्राहकांनी भरून काढली. त्याचबरोबर यापूर्वी कधीही न झालेली उलाढाल देखील नाशिकसह खानदेशात व्यावसायिकांनी अनुभवली. बाजारपेठेत नागरिक उतरले त्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली व त्यातून बाजारपेठेला चैतन्य मिळाले. याचाच अर्थ खर्च करण्याच्या ग्राहकाच्या मानसिकतेत मोठा बदल झाला आहे. लोक आता खर्च करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. खरेदीचा हा टेम्पो कायम ठेवण्यासाठी दुसऱ्या बाजूने म्हणजे व्यावसायिकांनी देखील हात आखडता घेण्याची आवश्यकता नाही. ग्राहकांचा विश्वास अधिक कसा वाढविता येईल, याची जबाबदारी आता व्यावसायिकांवर नव्याने आली आहे.

‘ग्राहक देवो भव’ हे ब्रीद आता प्रत्येक व्यावसायिकाने अंगीकारणे गरजेचे आहे. तर आणि तरच बाजारपेठेतील चैतन्य कायमस्वरूपी टिकून राहील. लोकांच्या अपेक्षा आता अधिक वाढत जातील. त्या पूर्ण करण्याची जबाबदारी पेलावी लागेल. दीपावलीच्या निमित्ताने बाजारपेठेतील झालेली उलाढाल ही फार मोठी आहे. मेट्रो शहरांच्या जवळपास असलेली नाशिकची उलाढाल नाशिकच्या विकासाची पुढील दिशा अधोरेखित करणारी आहे. कुठल्याही शहराचा विकास हा तेथील ग्राहकांच्या खरेदीची क्षमता किती आहे, यावर अवलंबून असतो. यंदाच्या दीपावलीने नाशिककरांच्या तसेच उत्तर महाराष्ट्रातील जनतेची खरेदीची मर्यादा बाजारपेठेला दाखवून दिली आहे.

आरोग्यकडेही द्यावे तेवढेच लक्ष

कोरोनामुळे दोन वर्षे नागरिकांना कोंडमारा सहन करावा लागला. परंतु यंदाची दिवाळी मुक्त वातावरणात झाल्याने जनता देखील तेवढ्याच उत्साहाने सणाला सामोरी गेली. लोकांची खरेदीची क्षमता वाढली, हे या निमित्ताने स्पष्ट झाले. परंतु जेवढी उत्साहाने खरेदी झाली तेवढेच आरोग्याच्या समस्यांकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. खरेदीच्या उत्साहात न्हाऊन निघत असताना आरोग्य व शिक्षण या दोन्ही बाबींकडे तेवढ्याच ताकदीने लक्ष दिले गेले पाहिजे. मागच्या पिढीला अशिक्षितपणामुळे किती ठेचा सोसाव्या लागल्या, हे आत्ताच्या पिढीला माहीत आहे. त्यामुळे शिक्षणाचे महत्त्व प्रत्येक जण जाणतो.

कोरोनाने आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यामुळे आता एकूण उत्पन्नापैकी काही प्रमाणात का होईना आरोग्यासाठी खर्च बाजूला ठेवणे गरजेचे आहे. हात धुण्यापासून ते खाण्यापिण्यापर्यंत अशा प्रत्येक बाबींवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस महाग होत आहे. थोडक्यात, कुटुंबाचे अर्थ नियोजन पुन्हा एकदा नव्याने करण्याकडेही लक्ष पुरवावे लागणार आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com