Dhule: धुळे महापालिकेत `पाकीट` संस्कृती जिंदाबाद!

धुळे महापालिकेतील महासभेत महापौर प्रदीप कर्पे व विरोधकांमध्ये शाब्दीक चकमक उडाली.
Dhule Corporation Meeting
Dhule Corporation MeetingSarkarnama

धुळे : सार्वजनिक शौचालयांत (Public toilet) महिला- पुरुषांसाठी कोणती शौचालये आहेत याचा बोध होण्यासाठी फलक, चित्र नसल्याने घडणारे विचित्र प्रकार व भांडणे, नाल्याच्या पाण्याने शौचालयाची होणारी स्वच्छता अशा अनेक गंभीर तक्रारी (Complains) करत सत्ताधाऱ्यांसह विरोधी नगरसेवकांनी (corporators) महासभेत प्रशासनाचे वाभाडे काढले. यावेळी अमोल मासुळे (Amol Masule) यांनी महापालिकेत पाकीट संस्कृती (Bribe) जिंदाबाद आहे, असे सांगितले. (Dhule corportors aggressive on public utility services)

Dhule Corporation Meeting
Dhule News: भाजप म्हणते, साक्रीत ओला दुष्काळ जाहीर करा!‌

ही महासभा रंगली ती सत्ताधारी भाजपासह विविध पक्षांच्या नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या, फुटलेल्या टाक्यांमुळे दुर्घटनेची भिती, सहन करण्यापलीकडची दुर्गंधी, तुटलेले दरवाजे, स्वच्छतेचे तीनतेरा, अशा विविध तक्रारींचा एकीकडे भडिमार, तर सुस्थितीतील शौचालयात वीज, पाण्याची व्यवस्था नसणे या विषयांवर.

Dhule Corporation Meeting
Dhule News: भाजप म्हणते, साक्रीत ओला दुष्काळ जाहीर करा!‌

महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी सकाळी अकराला महासभा झाली. महापौर प्रदीप कर्पे, उपमहापौर अनिल नागमोते, आयुक्त देविदास टेकाळे, नगरसचिव मनोज वाघ, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी अजेंड्यावरील विषयांवर प्रथम चर्चा व निर्णय होईल, असे महापौर कर्पे म्हणाले, तर विरोधकांनी इतर विषयांवर चर्चेची मागणी केली. यावरून सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपल्याने गोंधळ उडाला.

विषयपत्रिकेतील सार्वजनिक सुलभ शौचालयांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी अंदाजपत्रकात तरतूद करणे व सात वर्षांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचा विषयावर चर्चा झाली. या विषयावर सत्ताधाऱ्यांसह विरोधी नगरसेवकांनी प्रशासनाचे वाभाडे काढले.

पाकीट संस्कृती जिंदाबाद

विरोधी पक्षनेते कमलेश देवरे यांनी सदस्यांचा कार्यकाळ आता अडीच वर्षच असताना, शौचालयाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सात वर्षांचा ठेका देण्याबाबत अट्टहास कशासाठी, असा प्रश्‍न केला. सत्ताधारी भाजपच्या प्रतिभा चौधरी यांनी शौचालयांप्रश्‍नी महिलांनी आम्हाला घेराव घातल्याचे म्हणत दुरवस्था तर आहेच, पण महिला- पुरुषांसाठी कोणताही शौचालये आहेत हे दर्शविणारे फलक, चित्रही नसल्याने भांडणे होतात, असा मुद्दा मांडला. पुष्पा बोरसे यांनीही हा मुद्दा मांडला, तसेच चंदननगरमधील शौचालयाची टाकी फुटली असून, त्यात कुणी पडले तर काय, असा सवाल केला.

अमोल मासुळे यांनी २०१८ पासून हे विषय मांडत असताना, अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. यामागे काय गौडबंगाल आहे, असा सवाल केला. पाकीट संस्कृती जिंदाबाद असल्याचा व काही ‘पोंगापंडित’ सहकारी नगरसेवक अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात, असा आरोपही त्यांनी केला. वंदना भामरे यांनी प्रभागातील शौचालयाचे आऊटलेट कुठे, असा सवाल करत पाहणी करून त्याचा शोध घ्यावा, अशी मागणी केली. एमआयएमचे सईद बेग यांनी आपल्या प्रभागात तर नाल्याच्या पाण्याने शौचालय साफ केले जात असल्याचा गंभीर मुद्दा मांडला. संजय भील यांनी आपल्या प्रभागात शौचालयांची स्थिती चांगली असताना, विजेची व्यवस्था नसल्याचे सांगितले. सुनील बैसाणे यांनी वैयक्तिक शौचालयांची माहिती द्यावी, सार्वजनिक शौचालयांची संख्या कमी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

महापौरांचा संताप अन्‌ आदेश

सार्वजनिक शौचालयांबाबत तक्रारींवर महापौर कर्पे संतप्त झाले. तुम्ही काय काम करता, असा अधिकाऱ्यांना प्रश्‍न करत येत्या चार-पाच दिवसांत सर्व कामे झाली पाहिजेत, अन्यथा कारवाई करेन, अटी-शर्तीनुसार कामे होत नसतील तर ठेकेदारांवरही कारवाई करा, असा आदेश त्यांनी दिला. तब्बल पाच तास चाललेल्या महासभेपुढे तब्बल ३५ विषय होते, यातील काही विषय तहकूब झाले. इतर विषयांना मंजुरी देण्यात आली.

-------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com