BJP News: बूथप्रमुखच खरा पक्षाचा कणा

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नाशिकला बूथ समिती सदस्यांची बैठक संपन्न
Chandrashekhar Bavankule
Chandrashekhar BavankuleSarkarnama

नाशिक : पाथर्डी (Nashik) भागात राबविण्यात येणारी बूथ रचना पुढे जाऊन संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) राबविण्याचा विचार असून, बूथप्रमुख हा खऱ्या अर्थाने पक्षाचा कणा असतो, असे मत भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी व्यक्त केले. आगामी नाशिक महापालिकेच्या (NMC) पार्श्वभूमीवर श्री. बावनकुळे यांनी नाशिकचा (Nashik) दौरा केला. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी त्यांचे उस्फुर्त स्वागत केले. (BJP state president was get grand welcome in nashik)

Chandrashekhar Bavankule
BJP News: बावनकुळेंची जीभ घसरली, सत्ता गेल्यापासून ‘ते’ बावचळलेत..!

सशक्त बूथ सशक्त भाजप अंतर्गत द्वारका मंडलमधील पाथर्डी फाटा बूथ क्रमांक ३२४ मध्ये बूथप्रमूख जितेंद्र चोरडिया यांच्या निवासस्थानी झालेल्या बूथ समिती सदस्यांच्या बैठकीत ते बोलत होते. आमदार प्रा. देवयानी फरांदे, शहराध्यश गिरीश पालवे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, ज्येष्ठ नेते विजय साने, लक्ष्मण सावजी, मंडलाध्यक्ष सुनील देसाई, उदय जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Chandrashekhar Bavankule
MVP News: दर तीन महिन्यांनी शरद पवारांची भेट घेऊ!

श्री. बावनकुळे म्हणाले, की कोणत्याही पक्षाची मजबूत बांधणी ही सशक्त बूथ रचनेवरच अवलंबून असते आणि भाजपाची बूथरचना सशक्त आणि वाखाणण्याजोगी आहे, याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान वाटतो.

‘सशक्त बूथ-सशक्त भाजप’बाबत सांगताना बूथ रचना कशी असावी? बूथप्रमुखाचे काम काय याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. द्वारका मंडलतर्फे मंडलाध्यक्ष सुनील देसाई आणि चोरडिया यांनी श्री. बावनकुळे यांचा सत्कार केला. बूथ समिती सदस्य संजय नवले, भाऊसाहेब तांबे, संतोष करनकाळ, संतोष भंगाळे, डॉ. स्वप्नील खैरनार, उदय भावसार, पंकज वरखेडे, विशाल भोळे, सचिन जैन, एकनाथ नवले, राम बडगुजर, भगवान दोंदे, साहेबराव आव्हाड, पुष्पा आव्हाड, उत्तम उघाडे, राकेश बागूल, किरण जैन, सागर तांबे, ॲड. नीता अकोटकर, ज्ञानेश्वरी चौधरी, विद्या मुसळे, वैशाली शिंदे, दिलीप साळुंखे, दीपक देव, पांडेजी, नितीन कुलकर्णी, अंकुश कुलकर्णी, गजानन भुसारी, निखिल पाटील, संजय केदारे, किशोर चौधरी आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in