बोदवडकरांचा एकनाथ खडसे नव्हे तर चंद्रकांत पाटलांवर विश्वास

बोदवड नगरपंचायतीच्या निकालाने शिवसेना नेते उत्साहात
Shivsena leader Gulabrao Patil
Shivsena leader Gulabrao PatilSarkarnama

बोदवड : मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीत माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रसेचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पॅनेलचा निसटता पराभव झाला. शिवसेनेने बहुमत मिळवल्याने तो राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत निकालावरून दावे प्रतीदावे सुरु झाले आहेत. बोदवडच्या मतदारांचा एकनाथ खडसे नव्हे तर शिवसेना नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास असल्याचा दावा पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केला आहे.

Shivsena leader Gulabrao Patil
निफाडला अनिल कदमच बॅास; राष्ट्रवादीच्या आमदार दिलीप बनकरांना धक्का

नगरपालिकेच्या निवडणुकीत सुरवातीपासूनच राजकीय वातावरणात बदल झालेला होता. ते सगळ्यांना जाणवत होते. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन बोदवडच्या नागरिकांनी त्यांना प्रतिसाद दिला आहे. बोदवड नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीतच शिवसेनेला बहुमत मिळाले आहे. मला खात्री आहे की, आगामी काळात बोदवडचा राहिलेला विकास, नागरिकांचे प्रश्न आम्ही निश्चितच सोडवू. जळगाव जिल्ह्यात ही एकमेव नगरपंचायतीची निवडणूक आहे. ती आम्ही जिंकल्याने शिवसेनेने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

Shivsena leader Gulabrao Patil
नाशिक महापालिकेत भुजबळ, एकनाथ शिंदे यांच्या नावाने बदल्यांचे रॅकेट?

जळगाव जिल्ह्यातील ही एकमेवर निवडणूक होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन, पालकमंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील हे दोन्ही खडसे विरोधक तळ ठोकून होते. तर श्री. खडसे यांची ही घऱची निवडणूक होती. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेच्या दृष्टीने तीला महत्व होते. त्यात खडसे यांना बहुमत हुकले. त्यामुळे हा चर्चेचा विषय़ आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com