मोदींसाठी केलेल्या मंत्रजपाकडे भाजप लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठ!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून भाजप आध्यात्‍मिक आघाडीतर्फे महामृत्युंजय जप.
Mantra chanting for PM Modi
Mantra chanting for PM ModiSarkarnama

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे, यासाठी भाजप (BJP) आध्यात्मिक आघाडीतर्फे शुक्रवारी रामकुंडावरील (Nashik) महादेव मंदिरात महामृत्युंजय मंत्रजप करण्यात आला. या वेळी शहरातील पदाधिकारी साधुसंत उपस्थित होते. निवडक पदाधिकाऱ्यांशिवाय लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते.

Mantra chanting for PM Modi
कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातच, धर्मभास्करला लाजवेल असा ५० कोटींचा घोटाळा!

या वेळी भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले, शहराध्यक्ष गिरीश पालवे, पंचवटी मंडलचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, सुजाता करंजीकर, सुनील केदार, प्रशांत वाघ, बापू देव, चंद्रशेखर गायधनी, प्रतीक शुक्ल, छोटू तिवारी, मकरंद खांदवे, महंत भक्तिचरणदास यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी पौरोहित्य केले.

Mantra chanting for PM Modi
Shocking: कोरोना लसीकरणासाठी रुग्णालय कशाला? झेरॉक्स सेंटरमध्ये या!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिली होती. त्याबाबतभाजपने अतिशय आक्रमकपणे हा विषय लावुन भरला आहे. त्यासाठी काँग्रेस आणि भारतीय जनात पक्षा सातत्याने एकमेकांवर राजकीय आरोप करीत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने पंतप्रधान मोदी यांच्या दिर्घायुष्यासाठी महामृत्यूंजय यज्ञ करण्याचा उपक्रम केला आहे. त्याचाच भाग म्हणून अद्यात्मिक आघाडीतर्फे हा मंत्रजाप करण्यात आला होता. मात्र त्याला मोजके पदाधिकारी वगळता फारशी उपस्थिती नव्हती. विशेषतः लोकप्रतिनिधी व या भागातील एकही नगरसेवक आला नव्हता.

लोकप्रतिनिधींची पाठ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या भाजपच्या सर्वोच्च नेत्याच्या दीर्घायुष्यासाठी हा मंत्रजप आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे भाजप लोकप्रतिनिधींची उपस्थितीही या ठिकाणी आवश्‍यक होती. परंतु निवडक पदाधिकारी वगळता पक्षाच्या अन्य लोकप्रतिनिधींनी याकडे साफ काणाडोळा केल्याचे दिसून येते. पंचवटीत विभागातून या पक्षाचे तब्बल १९ नगरसेवक निवडून आले आहेत, त्यापैकी शांता हिरे यांचे निधन झाले. तरीही प्रभाग सभापतींसह उर्वरित १८ नगरसेवकांनी या मंत्रजपाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com