Shivsena News; भाजपच्या इच्छुक शुभांगी पाटील उमेदवारीसाठी मातोश्रीवर!

पदवीधर निवडणुकीत शिवसेनाही झाली सक्रीय, मातोश्रीवर पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु
Uddhav Thackrey
Uddhav ThackreySarkarnama

नाशिक : नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघात भाजपच्या (BJP) इच्छुक उमेदवार शुभांगी पाटील, (Shubhangi Patil) धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) आणि धनराज विसपुते (Dhanraj Vispute) भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते. आता भाजप सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांना पाठींबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे यातील शुभांगी पाटील यांनी आज मातोश्रीवर भेट दिली. त्यांनी शिवसेनेची (Shivsena) उमेदवारी मागीतल्याचे कळते. (BJP`s probable candidate Shubhangi Patil ask Shivsena support)

Uddhav Thackrey
Ajit Pawar News; ...आता अजित पवार देणार तांबेंना शह?

नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत काँग्रेस आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज न भरता चिरंजीव सत्यजीत तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे निर्माण झालेला राजकीय पेच सोडविण्यासाठी महाविकासआघाडीचे नेते व्यस्त आहेत.

Uddhav Thackrey
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत चालताना हृदयविकाराचा झटका; काँग्रेस खासदाराचा मृत्यू

आज यासंदर्भात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेत्यांची बैठक मातोश्रीवर झाली. यावेळी नाशिकचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांसह विविध नेते उपस्थित होते. यावेळी पदवीधर निवडणुकीतील रणनितीविषयी चर्चा झाली.

दरम्यान भाजपची उमेदवारी मिळण्याची संधी हुकल्याने गेले दोन दिवस शुभांगी पाटील यांनी सातत्याने अन्य पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. काँग्रेस पक्षाकडून पुरस्कृत केले जावे यासाठी त्यांनी स्थानिक तसेच राज्य पातळवरील नेत्यांच्या भेटी घेतल्या. आज त्यांनी दुपारी मातोश्रीवर संपर्क केला. यावेळी त्यांनी शिवसेनेचा पाठींबा मिळावा यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. दुपारपर्यंत त्यांची भेट झाली नव्हती, असे सुत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com