धुळे शहरात महापौर प्रदीप कर्पे ‘रिटर्न्स’

धुळे शहराच्या महापौरपदी प्रदीप कर्पे यांची बिनविरोध निवड झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
Pradip Karpe, Mayor, Dhule
Pradip Karpe, Mayor, DhuleSarkarnama

धुळे : महापौरपदाच्या (Mayor) आरक्षणाचा मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला पूर्वी एक दिवस आधी महापौर पदाचा राजीनामा देणारे भाजपचे (BJP) प्रदीप कर्पे (Pradeep Karpe) दोन महिन्याच्या खंडानंतर पुन्हा एकदा महापौरपदी विराजमान झाले. महापालिकेतील (Dhule) विशेष सभेत महापौरपदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. (BJP workers celebrates after newly appointed mayor)

Pradip Karpe, Mayor, Dhule
शिंदखेडा पंचायत समितीचा लाचखोर कर्मचारी जाळ्यात

राज्यात आता आपलीच (भाजप) सत्ता असल्याने शहराचा चौफेर विकास होण्यास मदत होईल, असा विश्‍वास महापौर कर्पे यांनी व्यक्त केला.

Pradip Karpe, Mayor, Dhule
वाघ, वाघीण अन् आता वाघोबाही गेले, उरले केवळ मावळे…

महापालिकेत मंगळवारी महापौर निवडीची विशेष सभा झाली. जिल्हाधिकारी जलज शर्मा पीठासीन अधिकारी होते. महापौरपदासाठी विहित मुदतीत श्री. कर्पे यांचा अर्ज असल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्यात जमा होते. विशेष सभेत नियमानुसार प्रक्रिया होऊन यावर शिक्कामोर्तब झाले. महापौरपदाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होती. तिचा निकाल येण्यापूर्वी एक दिवस आधी अर्थात १६ मे २०२२ ला श्री. कर्पे यांनी महापौर पदाचा राजीनामा दिला होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य शासनाकडून महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले. नंतर या पदावर कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता होती. परंतु, पक्षाने श्री. कर्पे यांनाच संधी दिली. त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मनपा आयुक्त देविदास टेकाळे, स्थायी समिती सभापती शीतल नवले, उपमहापौर अनिल नागमोते, भाजपचे बबन चौधरी आदींनी श्री. कर्पे यांचा सत्कार केला. माजी महापौर चंद्रकांत सोनार, नगरसेवक अमोल मासुळे, सुनील बैसाणे, हिरामण गवळी, दगडू बागूल, नगरसेविका वालीबेन मंडोरे, प्रतिभा चौधरी, सुरेखा उगले, डॉ. माधुरी बोरसे, मायादेवी परदेशी, ओमप्रकाश खंडेलवाल, महादेव परदेशी, चेतन मंडोरे, बबनराव चौधरी आदी उपस्थित होते.

विकासास मदत

महापौरपदी निवडीनंतर श्री. कर्पे म्हणाले, की पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यावर भर असेल. त्यासाठी लवकरच नियोजन करू. डेंगी, मलेरिया सारखे आजार पसरू नयेत यासाठी पावले उचलली जातील. अतिक्रमणे हटविण्यात येतील. भूमिगत गटार योजनेच्या ठेकेदाराला बोलावून रस्त्यांची कामे करून घेतली जातील.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in