पालकमंत्री छगन भुजबळांच्या प्रभागात भाजपची धडपड!

महापालिकेच्या गोविंदनगर भागातील वर्चस्वासाठी सर्वपक्षीय इच्छुकांची धडपड.
MLA Seema Hirey & Chhagan Bhujbal
MLA Seema Hirey & Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : नाशिक रोड, नाशिक व सिडको भागाला जोडल्या जाणाऱ्या गोविंदनगरचा या प्रभागात समावेश होतो. पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे निवासस्थान या भागात असले तरी आतापर्यंत शिवसेनेच्याच (shivsena) पारड्यात यश पडले आहे. यंदा आघाडी म्हणून पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप होईलच. स्थान पक्के करण्यासाठी भाजपची (BJP) धडपड या भागात राहील.

MLA Seema Hirey & Chhagan Bhujbal
अखेर भाजपची सत्ता असलेली नाशिक महापालिका बरखास्त!

(स्व.) कल्पना पांडे व कल्पना चुंभळे यांच्या रूपाने या प्रभागावर शिवसेनेची छाप आहे. मागील टर्ममध्ये प्रवीण तिदमे यांनादेखील धनुष्यबाणावरच यश मिळाल्याने शिवसेनेचे हक्काचे जे काही ठराविक पॉकेट्स आहे, त्यात गोविंदनगर भागाचा समावेश करता येईल. यापूर्वीदेखील शिवसेनेच्याच मागे हा भाग भक्कमपणे उभा राहिला. पालकमंत्र्यांचे निवासस्थान असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले नाही. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारासाठी पालकमंत्री विशेष आग्रही राहतील.

MLA Seema Hirey & Chhagan Bhujbal
धुळ्याचे ‘पीडब्ल्यूडी’ अधिकारी खुले आम मागतात पैसे?

पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांची मुलगी रश्‍मी या प्रभागातून नशीब अजमावणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या अनुषंगाने आमदार हिरे यांची कसोटी या भागात लागेल. पन्नासहून अधिक खासगी रुग्णालये, नव्याने उदयाला येत असलेले बिझनेस सेंटर, नाशिक, नाशिक रोड, सिडको, मुंबई नाका या भागाला जोडणारे रस्त्यांचे जाळे या महत्त्वाच्या बाबी या प्रभागाचे वैशिष्ट दर्शविणारे आहे. बॅंका, सरकारी, व खासगी कार्यालयांमध्ये काम करणारा उच्चभ्रू वर्ग येथे सापडेल तेवढ्याच संख्येने कारखान्यांमध्ये काम करणारा कामगार वर्गदेखील येथे आहे. दोन्ही मतदारांचे कॉम्बिनेशन किंवा बॅलन्स करणारे विजयपथावर राहील.

हे आहेत इच्छुक

राजेंद्र महाले, कल्पना चुंभळे, प्रवीण तिदमे, अश्‍विनी बोरस्ते, रश्‍मी हिरे-बेंडाळे, कैलास चुंभळे, सुरेखा नेरकर, अक्षय खांडरे, जगन पाटील, सीमा बडदे, सुनीता रणाते, रवींद्र पाटील, राम पाटील, शैलेश साळुंखे, ॲड. अजिंक्य गिते, शिल्पा पारनेरकर, यशवंत नेरकर, राहुल गणोरे, अभय गवळी, शिवाणी पांडे, सागर मोटकरी, अमर वझरे, शाहरुख शेख, शीतल वसावे, स्वप्नील पांगरे, प्रवीण मोरे, बाबासाहेब गायकवाड, चारुशिला गायकवाड, हरीश पांगरे, संगीता पाटील, सोनाली ठाकरे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com