धुळे-नंदूरबारचा संदेश भाजपला संपूर्ण राज्यासाठी इशारा?

जिल्हा परिषद गट आणि चार पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या ८ जागा घटल्या.
धुळे-नंदूरबारचा संदेश भाजपला संपूर्ण राज्यासाठी इशारा?
Nandurbar by election Result celebrationSarkarnama

धुळे : जिल्हा परिषद गट (ZP) आणि चार पंचायत समित्यांच्या (Panchayat Samiti by electon result bjp retain power) पोटनिवडणुकीत भाजपच्या ८ जागा घटल्या. (BJP`s loss on 8 seats) जिल्हा परिषदेतील सत्ता थोडक्यात बचावली. मात्र काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) तीन जागांवर पराभव करत भाजपला धक्का दिला. त्यामुळे भाजप नेते धास्तावले आहेत. राज्यात सत्ता नसताना यातील किती भविष्यात तग धरतील (Will bjp leaders stay with party in future without power in state) ही भाजपची चिंता वाढली आहे.

Nandurbar by election Result celebration
जि.प. सदस्य ते खासदार सबकुछ विजयकुमार गावितांच्या घरात!

जिल्हा परिषदेत भाजपची एकहाती सत्ता आहे. यात डिसेंबर २०१९- जानेवारी २०२० मधील निवडणुकीत ५६ पैकी भाजपला एका अपक्षाच्या पाठिंब्यासह ४०, काँग्रेसला ७, राष्ट्रवादी कॉंग्रेसला ३, शिवसेनेला ४, अपक्षांना २ जागा होत्या. धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर पंचायत समिती गणांच्या ११२ पैकी भाजपला ७०, कॉंग्रेसला १६, राष्ट्रवादी कॉंग्रेसला ६, शिवसेनेला १० आणि अपक्षांना दहा जागा मिळाल्या होत्या. आताच्या पोटनिवडणुकीत गटामध्ये भाजपच्या तीन, तर गणामध्ये पाच, अशा एकूण आठ जागा कमी झाल्या आहेत.

गटाच्या रिक्त पंधरा जागांमध्ये धुळे व शिंदखेडा तालुक्यातील मिळून भाजपच्या ११, काँग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी दोन जागा होत्या. निकालाअंती कापडणे गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार किरण पाटील, नेर गटात काँग्रेसचे उमेदवार आनंदा पाटील आणि बोरविहीर गटात काँग्रेसच्या उमेदवार मोतनबाई पाटील यांनी भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला.

Nandurbar by election Result celebration
जि. प. पराभवानंतर विजयकुमार गावितांचा भाजपवरच बॅाम्ब !

विजयी उमेदवार असे

पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार असे : भाजप (८ जागा) धुळे तालुका- धरती देवरे (लामकानी, ८६९० मते), अश्‍विनी पवार (फागणे, ६२७८), राघवेंद्र पाटील उपाख्य राम भदाणे (नगाव, ७५२६), संग्राम पाटील (कुसुंबा, ७९३४), आशुतोष पाटील (शिरूड, ७६५४), शिंदखेडा तालुका- महावीरसिंह रावल (मालपूर, ७७१०), सोनी कदम (खलाणे, ७३६७), संजीवनी शिसोदे (नरडाणा, ५७४७); राष्ट्रवादी काँग्रेस (३ जागा). धुळे तालुका- किरण पाटील (कापडणे, ७१७०), मीनल किरण पाटील (मुकटी, ७२७२), शिंदखेडा तालुका- ललित वारूडे (बेटावद, ७६१२); काँग्रेस (२ जागा) : धुळे तालुका- आनंदा पाटील (नेर, ७५९९), मोतनबाई पाटील (बोरविहीर, ७६६९); शिवसेना (२ जागा) :- धुळे तालुका- शालिनी बाळासाहेब भदाणे (बोरकुंड, बिनविरोध), अनिता प्रभाकर पाटील (रतनपुरा, ४८२८).

यांचा झाला पराभव

पोटनिवडणुकीत जिल्हा परिषदेच्या लामकानी गटात भाजपच्या उमेदवाराने शिवसेनेच्या मिनाबाई पाटील (४३९४ मते), कापडण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने भाजपचे रामकृष्ण खलाणे (५९०७), अपक्ष दिनकर माळी, फागण्यात भाजपच्या उमेदवाराने काँग्रेसच्या नयना पाटील (५१९३), अपक्ष माया पाटील (२४५०), नगावला भाजपच्या उमेदवाराने काँग्रेसचे सागर पाटील (५१०२), वंचित आघाडीचे रवींद्र अहिरे, कुसुंब्यात भाजपच्या उमेदवाराने वंचित आघाडीच्या अभिलाषा देवरे, राष्ट्रवादीच्या वैशाली शिंदे (५८१२), शिवसेनेचे आधार हाके (७९९), नेरला काँग्रेसच्या उमेदवाराने भाजपचे संजय माळी (३५०७), बोरविहीरला काँग्रेसच्या उमेदवाराने भाजपच्या अश्‍विनी पाटील (५६१७), अपक्ष मनिषा गवळी, मुकटीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराने भाजपच्या कल्पना पाटील (६६७०), शिरूडला भाजपच्या उमेदवाराने काँग्रेसचे बापूराव पाटील (७०७५), अपक्ष प्रकाश बिऱ्हाडे, रतनपुरा येथे शिवसेनेच्या उमेदवाराने यांनी भाजपच्या कविता पाटील (३३७४), अपक्ष हर्षदा पाटील, मीना माळी, रेखा राजपूत यांचा पराभव केला.

पंचायत समित्यांची स्थिती

पंचायत समित्यांच्या ३० जागांमध्ये पूर्वीचे आणि आताचे पक्षिय बलाबल अनुक्रमे असे ः भाजप- २० व १५, राष्ट्रवादी काँग्रेस- १ व ३, शिवसेना- ३- ३, काँग्रेस ५- ६, अपक्ष- १- ३. यात शिरपूर येथे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये दाखल झालेले माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वात पंचायत समितीत प्रथमच भाजपची सत्ता आली आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणातील निकालानंतर विजयी उमेदवार, समर्थकांसह नेते, पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला.

...

Related Stories

No stories found.