Shivsena leader Sanjay Raut
Shivsena leader Sanjay RautSarkarnama

कोर्ट `विक्रांत` सारख्या प्रश्नावर दिलासा देत असेल तर जनतेचा उद्रेक होईल!

खासदार संजय राऊत यांनी गॅबियन वॉल प्रकल्पाचे लोकार्पण केले.

नाशिक : नाशिक (Nashik) शहर खऱ्या अर्थाने पवित्र आणि सुंदर करायचे असेल तर आगामी महापालिका निवडणुकीत (NMC) शिवसेनेचा भगवा हाती धरा. सेनेने आता दररोज भाजपचे (BJP scams) विविध घोटाळे बाहेर काढण्याचे ठरवले आहे. नाशिक महापालिकेचा स्मार्ट सिटीमधील आणि आयटीमधील घोटाळादेखील बाहेर काढला जाईल, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला.

Shivsena leader Sanjay Raut
संजय पवार शरद पवारांसमोरच व्यासपीठावर रडले!

शहरातील जुन्या भागातील नैसर्गिक नाल्यावर बांधलेल्या गॅबियन वॉल आणि जॉगिंग ट्रॅक, सीसीटीव्ही, रस्ते काँक्रिटीकरण कामाचे लोकार्पण खासदार राऊत यांनी केले. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.

Shivsena leader Sanjay Raut
नीलिमा पवार यांनी `मविप्र` संस्‍थेला उच्च पातळीवर नेले!

खासदार राऊत म्हणाले, वीर सावरकरांना भारतरत्न न देणाऱ्या भाजपला हिंदुत्वाचे नाव घेण्याचा अधिकार नाही. सध्या सुरू असलेल्या भोंग्यांच्या मदतीने निवडणूक जिंकता येत नाही, हे कोल्हापूरच्या निकालाने दाखवून दिले आहे. महागाई बेरोजगारी आणि इतर प्रश्नांनी होरपळत असलेल्या सर्वसामान्य जनतेला इतर ठिकाणी भरकटत नेण्याचे काम भाजप करत आहे. त्यासाठी राज्यातील नव्या एमआयएमची मदत घेतली जात आहे. कोर्ट विक्रांत सारख्या प्रश्नावर अशाच प्रकारे दिलासा देत असेल तर जनतेचा उद्रेक होईल आणि रस्त्यावर संबंधितांना जाब विचारेल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे. आता सेना आरपारची लढाई लढण्यासाठी उतरली असून अंगावर आले तर शिंगावर घेऊन आपटले जाईल.

यावेळी प्रकाश अमृतकर आणि सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नीलेश चव्हाण, माजी नगरसेवक दीपक दातीर, अमोल जाधव, श्याम साबळे, हर्षदा गायकर, सुवर्णा मटाले, मधुकर जाधव, शोभा मगर, छबू नागरे, सुधाकर जाधव, वसंत पाटील, दादाजी अहिरे, संजय भामरे, सुभाष गायधनी, बाळा दराडे, पवन मटाले, साधना मटाले, श्यामला दीक्षित, शिवानी पांडे, दीपक बडगुजर, नीलेश साळुंखे, सागर देशमुख उपस्थित होते.

सिडकोतून शिवसेनेचे ३० नगसेवक

श्री. बडगुजर प्रास्ताविकात म्हणाले, की आगामी महापालिका निवडणुकांत या भागातून ३६ पैकी किमान ३० नगरसेवक निवडून येतील. गॅबियनचा वॉल प्रकल्प राबवून समस्यामुक्त केले आहे. सिडकोचा अंतिम टप्प्यात असलेला घरांच्या मालकी बाबतचा प्रस्ताव शासनातर्फे लवकर मंजूर करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

माजी नगरसेविका हर्षा बडगुजर, विभागप्रमुख पवन मटाले आणि साधना मटाले यांनी स्वागत केले. संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड, वसंत गिते, विनायक पांडे, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, विलास शिंदे, माजी नगरसेविका हर्षा बडगुजर आदी व्यासपीठावर होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in