BJP News; नगरसेवक शहाणे, नागरे यांची जामीनासाठी धावाधाव!

राजकीय वादातून तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा नगरसेवकांवर आरोप
BJP corporator Mukesh Shahane & Vikram Nagre
BJP corporator Mukesh Shahane & Vikram NagreSarkarnama

नाशिक : मोक्कान्वये गुन्हा (FIR) दाखल संशयित तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात फरारी (Abscond) असलेले भाजपचे (BJP) नगरसेवक मुकेश शहाणे (Mukesh Shahane) आणि विक्रम नागरे (Vikram Nagare) यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली असून, त्यांच्या अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. (FIR registered against BJP corporators to impel for suicide)

BJP corporator Mukesh Shahane & Vikram Nagre
Dr. Rahul Aher; नार -पार प्रकल्पास दोन महिन्यात मान्यता!

या गुन्ह्यातील दोघेही संशयित मंत्री गिरीष महाजन यांच्या जवळचे असून ते पोलिसांवर दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप वैशाली शिंदे यांनी केला आहे. आरोप असलेले दोन्ही भाजपचे नेते वादग्रस्त तसेच विविध प्रकरणांशी संबंधीत असल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे.

BJP corporator Mukesh Shahane & Vikram Nagre
Police News; मावळत्या वर्षात नाशिकला मिळाले तीन पोलिस आयुक्त!

शहाणे व नागरे यांच्यावर खंडणी व तत्सम गुन्हे दाखल आहेत. राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसून मंत्री महोदयांमुळे पोलीस यंत्रणेवर दबाब आहे. त्यामुळे शहाणे व नागरे यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मला व माझ्या मुलांना न्याय मिळणार नाही. अन्यथा आपल्यासमोरही आत्महत्त्येशिवाय पर्याय नाही, असे वैशाली शिंदे यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

आत्महत्या केलेल्या अनिरुद्ध शिंदे यांना खोट्या गुन्ह्यांत फसवून भाजपचे पदाधिकारी विक्रम नागरे व मुकेश शहाणे यांनी त्यांचा छल केला. याबाबत खोटी तक्रार दाखल करून अटक करण्याचा प्रयत्न करीत होते. यातूनच शिंदे यांनी आत्महत्या केली. त्यामुळे त्यांना तत्काळ अटक करून कारवाई करावी, असे निवेदन आत्महत्त्या केलेल्या शिंदे याची पत्नी वैशाली शिंदे हिने पोलिस अधीक्षकांना यापूर्वी दिले होते.

भाजपचे पदाधिकारी विक्रम नागरे आणि माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यावर घोटी पोलिस ठाण्यात तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर दोघांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. भरवीर खुर्द (ता. इगतपुरी) येथील अनिरुद्ध शिंदे सातपूर पोलिस ठाण्यातील खंडणीच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटल्यानंतर गेल्या मंगळवारी दुपारी भरवीर खुर्द या मूळ गावी त्याने आत्महत्या केली होती.

त्यानंतर मृत शिंदेच्या पत्नीने घोटी पोलिस ठाण्यात नागरे आणि शहाणे यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. दोघांच्या जाचाला कंटाळून मानसिक तणावातून शिंदे यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आत्महत्या करण्यापूर्वी शिंदे यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामध्ये नागरे व शहाणे यांच्या नावाचा उल्लेख आहे. पोलिस दोघांचा शोध घेत असल्याची माहिती उपअधीक्षक अर्जुन भोसले यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com