राज्यात लोडशेडिंगचा गंभीर प्रश्‍न? : कंदील घेत भाजपचा आक्रोश मोर्चा

लोडशेडिंगच्या विरोधात भाजपचा (BJP) जळगावात आक्रोश मोर्चा
Girish Mahajan
Girish Mahajansarkarnama

जळगाव : किसानो के सन्मान मे भाजपा (BJP) मैदान मे, बंद करा, बंद करा लोडशेडिंग बंद करा, अशा घोषणा देत राज्यातील लोडशेडिंग विरोधात भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

Girish Mahajan
राज ठाकरेंनी मोदींकडे केल्या 'या' दोन मागण्या

शहरातील शिवतीर्थ मैदानाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्यामध्ये ट्रॅक्टरवर गिरीश महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे (Suresh Bhole), खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil), रक्षा खडसे (Raksha Khadse), माजी आमदार स्मिता वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते. चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) ट्रॅक्टरचे सारथ्य करीत होते.

जिल्हाभरातून भाजप कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. भारनियमनाच्या विरोधात हातात कंदील तर अनेक कार्यकर्त्यांच्या हातात लोडशेडिंग करणाऱ्या शासनाचा धिकक्कार असो असे फलक होते. हा मोर्चा स्टेट बँक, बसस्थानक, गांधी उद्यान मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Girish Mahajan
कोल्हापुरात भाजपाचा विजय नक्की; चंद्रकांतदादांचा विश्‍वास !

साधना महाजन पायी सहभागी

मोर्चात नेते ट्रॅक्टरवर असले तरी गिरीश महाजन यांच्या पत्नी व जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन मोर्चात पायी सहभागी झाल्या होत्या. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यासमवेत त्या होत्या. राज्यात शासनच ठिकाणावर नाही राज्यातील काही मंत्री व अधिकारी कारागृहात आहेत. काही मंत्र्यावर आरोप आहेत. राज्यात लोडशेडिंगचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे नाराज आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यास निष्कीय ठरले आहे, असा आरोप महाजन यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com