सटाणा येथे पदाधिकाऱ्यांचा भाजपला गुडबाय, राष्ट्रवादीत प्रवेश!

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत केला प्रवेश
सटाणा येथे पदाधिकाऱ्यांचा भाजपला गुडबाय, राष्ट्रवादीत प्रवेश!
Guardian Minister Chhagan Bhujbal welcomes BJP LeadersSarkarnama

नाशिक : सटाणा येथील भाजप पदाधिकारी अन्‌ मनमाडच्या सामाजिक कार्यकर्त्यांना पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश दिला. पक्षात प्रवेश केलेल्यांचा सन्मान राखला जाईल. सरकारच्या माध्यमातून सामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच कटिबद्ध आहे, अशी ग्वाही श्री. भुजबळ यांनी या वेळी दिली.

Guardian Minister Chhagan Bhujbal welcomes BJP Leaders
सुमंत रुईकरांचा संकल्प नाशिकचे `हे` शिवसेना कार्यकर्ते पूर्ण करणार!

येथील भुजबळ फार्ममधील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार संजय चव्हाण, दीपिका चव्हाण, संजय पवार, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, बागलाण तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष पांडूनाना सोनवणे, नांदगांव विधानसभा अध्यक्ष विनोद शेलार आदींच्या उपस्थितीत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. सटाणा व मनमाड शहराचील राजकारणाला त्यामुळे वेगळे वळण मिळणार आहे. विशेषतः भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्याने भाजपला सटाणा शहरातील राजकारणात धक्का बसला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, लोकहिताची कामे मार्गी लावावीत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

चौंधाने (सटाणा) येथील भाजप उपाध्यक्ष प्रकाश मोरे, विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष भगवान मोरे, संजय मोरे, संजय शेवाळे, प्रवीण मोरे, मच्छिंद्र मोरे, भगवान मोरे, बाळू मोरे, श्‍यामकांत मोरे, दत्तू मोरे, मुरलीधर खैरनार, एकनाथ मोरे, रोशनी मोरे, विमलबाई मोरे, दिनेश मोरे, आप्पा पवार, खंडू मोरे, मनोहर मोरे, राहुल वाघ, मोरेनगर भाजप ओबीसी सेलचे उपाध्यक्ष सुरेश आहिरे, विनोद बोरसे, कमलाकर वाघ, राज वडजे, रवी बोरसे, दादा बोरसे, गुलाम शेख, धनराज वाघ, अजित खैरनार, शंकर देवरे, बापू मोरे, प्रभाकर मोरे, राजेंद्र मोरे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in