नाशिक महापालिकेत भाजप २०१७ लबाडीने जिंकली होती

महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सत्तेचा वापर करून लबाडी केली होती.
नाशिक महापालिकेत भाजप २०१७ लबाडीने जिंकली होती
Bhausaheb Choudhary, ShivsenaSarkarnama

नाशिक : महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सत्तेचा वापर करून लबाडी केली होती. (BJP done a cheating in NMC election in 2017) नाशिकमध्ये ते कपटाने विजयी झाले होते.(BJP won election by fraud) ते आमच्या लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांनी मतपत्रिकेत केलेले घोटाळे आम्ही उघड केले. त्यामुळे त्यांचे अवसान गळाले आहे, असे शिवसेनेचे महानगरप्रमुख, नगरसेवक सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी सांगितले.

नाशिक महापालिकेच्या निवडणूकतयारीसाठी शिवसेनेचा मेळावा सिडको येथे झाला. पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी श्री. बडगुजर यांनी हा आरोप केला.

Bhausaheb Choudhary, Shivsena
आमदार सरोज अहिरे शिवसेनेला खरोखर शिंगावर घेतील?

भारतीय जनता पार्टीने मोठ्याप्रमाणात मतदारांची दुबार नोंदणी करून यापूर्वीची निवडणूक कपटाने जिंकली. आपण त्यांची ही लबाडी निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिली आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने मतदार यादीचे शुद्धीकरण हाती घेतली आहे. त्यामुळे भाजपाचे अवसान पुरते गळाले आहे. परंतु ते स्वस्थ बसणार नाहीत. निवडणुका जिंकण्यासाठी त्यांच्याकडून नवे फंडे अजमाविण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र ते यशस्वी होणार नाहीत याची सर्व शिवसैनिकांनी आणि विशेषतः बूथप्रमुखांनी अगदी डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी, असे आवाहन बडगुजर यांनी केले.

Bhausaheb Choudhary, Shivsena
मनसे म्हणते युती करू...भाजपचे मात्र तोंडावर बोट!

यावेळी श्री. चौधरी म्हणाले, कोणत्याही पक्षाचे यश सक्षम बूथरचनेवर अवलंबून असते. त्यामुळेच शिवसेनेने ही यंत्रणा सक्षम करण्याचे काम गांभीर्याने घेतले आहे. बूथ प्रमुखांच्या सूचनांचा आदर करून त्यांना सातत्याने प्रोत्साहित केले जाते. बूथ प्रमुखांनीही डोळ्यात तेल घालून आपली जबाबदारी पार पाडावी. पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराच्या विजयासाठी मोलाचा हातभार लावावा.

ते पुढे म्हणाले, बूथ प्रमुखाला आपापल्या भागाची माहिती असते. मतदारांशी त्याचा दैनंदिन संबंध येतो. त्यांच्या अडीअडचणीला तो सहजगत्या धावून जाऊ शकतो. त्यामुळेच प्रत्येक बूथ प्रमुखाने आपापल्या भागात जनसंपर्काचे व्यापक जाळे विणावे. यावेळी नाशिक महापालिकेवर एकहाती सत्ता आणण्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वप्न बघितले आहे, ते साकार करण्यास तुमचे मोलाचे योगदान असेल. त्याची खूणगाठ मनाशी पक्की बांधा आणि आतापासूनच नव्या जोमाने कामास लागा.

यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, महिला आघाडीच्या संघटक रंजना नेवाळकर, विधानसभा संपर्क संघटक संगीता खोडाना, मंदा दातीर, मंगला भास्कर, युवा सेना जिल्हाधिकारी दिपक दातीर, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, महानगर संघटक योगेश बेलदार, डी. जी.सुर्यवंशी, प्रविण तिदमे, नगरसेविका हर्षा बडगुजर, हर्षदा गायकर, भागवत आरोटे, मधूकर जाधव, चंद्रकांत खाडे, संतोष गायकवाड, सुदाम ढोमसे, कल्पना चुंबळे, निवृत्त निवडणूक आधिकारी धनंजय खाडीलकर, चंद्रकांत पांडे, शोभा मगर, शोभा गटकळ, लक्ष्मी ताठे, शोभा दोदे आदी उपस्थित होते.

...

Related Stories

No stories found.